खालापूरात परंपरागत श्री कृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्साहात साजरी

 खालापूरात  परंपरागत श्री कृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्साहात साजरी





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २८ ऑगस्ट 


             शिवशंभो भजन मंडळ व खालापूर ग्रामस्थ यांनी परंपरागत चालत आलेल्या भजनाच्या माध्यमातून   श्री कृष्ण जन्मोत्सव रात्री १२ वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरा करण्यात आला.सकाळी मंदाताई भोसले व तानाजी भोसले यांच्या घरासमोरील खांब रोवून खांबावरील दहीहंडी बांधण्यात आली.यावेळी बाळ गोपाळांनी दहीहंडीच्या गाण्याच्या ठोक्यावर बेधुंद होवून नाचणारी तरुण वर्ग आणी बालगोपाल यांची जुगलबंदी पहावयास मिळाली.दहीहंडी फोडल्यानंतर सामुदायिक आरती घेण्यात आली.
           तरुण वर्गापासून ते बाळ गोपाळांचा सण म्हणजे दहीहंडी शहरा प्रमाणे ग्रामीण भागात दहीहंडी सण उत्साहाने साजरा करण्यात आला.काल कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी तरुण वर्गामध्ये जणू स्पर्धा निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले.त्याच बरोबर आज वरुण राजाचा सुद्धा बाळ गोपाळावर पाण्याचा अभिषेक करीत असल्यामुळे या दहिहंडीस वेगळेच स्वरुप प्राप्त झाले होते.
                   छत्रपती शिवाजी महाराज चौक खालापूर येथील दहीहंडी,अंकुश करंजकर ,बीपीनशेठ घाटवल ,पप्पू पाटील ,वैभव भोईर ,दिनेश फराट यांच्या निवास स्थानी असलेली दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी  खालापूर ग्रामस्थ महिला वर्ग व बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण