खरिवली पंचायत समिती मध्ये शिवसेनेच्या संपर्क दौऱ्याला शिवसैनिकांच्या उस्फुर्त प्रतिसाद
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली /वावोशी : २२ ऑगस्ट
तीन दिवस सुरू असलेल्या खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या संपर्कदौरा अभियानाला प्रारंभ झाला असल्यामुळे.या अभियानात गावभेट दौऱ्याला विशेष महत्त्व देण्यात आले.आमदार महेंद्र थोरवे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौऱ्यात सहभागी झाले नसले तरी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विजय भाऊ पाटील यांनी मात्र या दौऱ्याची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण दौरा यशस्वी करण्यासाठी घेतलेले परिश्रम महत्वाचे आहेत.विरोधकांनी सुरू केलेला अपप्रचार राजकीय भाषेत खोडून काढतांना विरोधकांना चिमटे घेत विजयभाऊ पाटील यांनी शिवसैनिकांना सक्रिय केले आहे.
शांत असलेल्या शिवसैनिकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी विजयभाऊ पाटील यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासकामांची जंत्रीच संपर्क अभियान मांडायला सुरुवात केल्याने शिवसैनिकांचा या दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.
मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण खालापूर तालुक्यात गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विकास कामांच्या माध्यमातून केलेले बेछूट आरोपाचे खंडण करण्यासाठी जणू काय शिवसेनेच्या वतीने संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासाची खिल्ली उडविताना असे म्हटले होते की,आम्ही सुरू केलेल्या गावभेट दौऱ्यात आम्हाला कुठेही विकास पहायला मिळाला नाही.तर निधी नावाची महिला सुध्दा कुठे दिसली नाही.
या आरोपांचे खंडन करताना शिवसेनेच्या संपर्क दौऱ्याला सुरूवात करण्यात आल्याचे दिसून येत आहे.शिवसेनेच्या संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने गावागावात पोहचलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गावातील शिवसैनिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची जंत्रीच उघड केल्याने प्रसिध्दीमाध्यमाना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला विकास खरोखरच पहायला मिळाल्याने विरोधकांचे आरोप पोकळ असल्याचे यातून दिसून येते.
0 Comments