शिक्षक रवींद्र भोईर यांची नागाव - बागमळा नियुक्ती, खालापूर तालुक्यात २६ वर्ष विद्यार्थ्यांना दिले ज्ञानांचे धडे पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा

 शिक्षक रवींद्र भोईर यांची नागाव -  बागमळा नियुक्ती, खालापूर तालुक्यात २६ वर्ष विद्यार्थ्यांना दिले ज्ञानांचे धडे


 

पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
कुंभिवली : ७ ऑगस्ट,

                 खालापूर तालुक्यात गेली २६ वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानांचे धडे देत असतांना नुकताच त्यांची रायगड जिल्हा परिषद शाळा नागाव - बागमळा ( आलिबाग )येथे नियुक्ती झाल्यावर त्यांचा सेवा पुर्ती ( निरोप समारंभ )सोहळ्यांचे आयोजन कुंभीवली येथिल राजिप शाळेमध्ये करण्यांत आले.गेली पाच वर्ष या शाळेत मुलांना ज्ञानांचे धडे गिरवत होते.१९९८ पासून ते शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले खरसुंडी येथे ४ वर्ष,राजिप शाळा इसांबे येथे १० वर्ष,वांवढळ येथे ७ वर्ष अशी कारकिर्द या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सेवा देण्यांचे काम केले.
             

 रविंद्र भोईर 
 शिक्षक समवेत उत्तम व्यख्याते,म्हणून प्रचलित होते.त्याच बरोबर सुत्रसंचालन करीत होते.विवध माध्यमांची आवड आणी शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यांसाठी ते सातत्यांने जागृत होते.आजचे विद्यार्थी भविष्यांचा आधार स्तंभ या उद्दात विचारांतून त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले गेले आहे आहेत. 
               या कार्यक्रामाचे आयोजन राजिप शाळा कुंभिवली  मुख्याध्यापक -  बाळू बाबू चव्हाण यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांकडून भोईर सर यांना हिंदवी स्वराज्यांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट म्हणून देण्यांत आली.व शाळेकडून सन्मान चिन्ह,तसेच भोईर सर यांनी अनेक उपक्रम राबवून अनेक शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडविले. सीएसआर फंडातून शाळा सक्षम बनविली,सामाजिक शैक्षणिक २५० हुन अधिक उपक्रम,राबविले तसेच इसांबे - वावंढळ येथे असतांना केंद्रस्तरीय स्पर्धा,बिट स्तरीय तालुका स्तरीय,ग्राम पंचायत स्वच्छता दूत जनजागृती अभियान कार्यक्रम,आरोग्य शिबीर रक्तदान,वृक्षसंवर्धन,डिजिटल शाळा निर्मिती,विविध स्पर्धेचे आयोजन, करुन सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपुलकीचे घर निर्माण केले होते.             

            
यावेळी त्यांच्या पत्नी चेतना रविंद्र भोईर,तसेच   खरसुंडी मुख्याध्यापिका - अर्पिता चव्हाण,शाळा व्यस्थापक समिती अध्यक्ष  - योगेश पोळेकर,शाळा व्यस्थापक समिती सदस्य -निशा धावडे,पहल संस्था - स्वाती यादव,कोएसो शाळा सदस्य - पंढरीनाथ चाळके,जांभिवली शिक्षक -राजेंद्र सावंत,गणेश चोगले,खरसुंडी शिक्षिका - रंजना शेळके,खरसुंडी मुख्याध्यापक - एकनाथ अवाड,इसांबे - मनोहर देवघरे,स्वप्नील देवघरे,कुंभिवली मुख्याध्यापक बाळू चव्हाण,कुंभिवली शाळा - भुसे मॅडम,कुंभिवली ठाकूरवाडी शिक्षक - जयेंद्र पाटील,शिक्षक संघटना खालापूर - संदीप जाधव,शिक्षक -पालकर सर,कदम सर,सावरोली मुख्याध्यापक -बळीराम चव्हाण,खालापूर मुख्याध्यापक - सचिन कडू,शिक्षक - धनाजी थिटे,निंबोडे मुख्याध्यापक - मारुती दासरे,सावरोली शिक्षक - नारायण गाडे,शाळा व्यवस्थापक सदस्य - वनिता पेरणेकर,गणेश पेरणेकर,रेश्मा वाघमारे,शिक्षक - हनुमंत गाडे,धनाजी धिटे, मोहणे सर उपस्थित होते.


मिळालेले पुरास्कार
खालापूर सन्मान -२०१८
हेल्पपिंग हॅन्ड क्लब बेस्ट टीचर्स अवार्ड
युवा फौंडेशन आदर्श पुरस्कार,मनुष्य बळ विकास राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार
भोनंग सन्मान ( २०२४ )
मैत्रा फौंडेशन तर्फे शिक्षण महर्षी पुरस्कार




Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार