धनंजय गीध यांनी मोठ्या मुश्कीलिने आपत्ती टाळली

 धनंजय गीध यांनी मोठ्या मुश्कीलिने आपत्ती टाळली. 

हायड्रोजन वाहून येणाऱ्या वाहनातल्या सिलेंडर मधून झाली होती गळती



पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : ६ ऑगस्ट

              नेहमीच गजबजलेल्याf वसई विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनाला दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी अपघात झाला.  अपघातामुळे वाहनातले सर्व सिलेंडर महामार्गावर विखरून पडले होते. हायड्रोजनचा हवेशी संपर्क येऊन  रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर आग लागण्याची शक्यता गृहीत धरून महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, स्थानिक पोलीस यंत्रणा, जवळपासच्या सर्व फायर ब्रिगेड टीम त्या ठिकाणी दाखल झाल्या घटनेची तीव्रता पाहता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमला त्या ठिकाणी मदतीसाठी येण्याची गुरुनाथ साठेलकर यांच्या सहकार्यातून.आणी दुर्घटनांतील तज्ञ  असलेल्या धनंजय गीध यांना त्यांच्या सहकाऱ्यां समवेत त्या ठिकाणी जाण्यासाठी  रवाना केले. 
                अपघाताचे ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात रहावी या दृष्टिकोनातून धनंजय गीध यांनी तेथील यंत्रणांना सूचना देण्यांत आल्या. रसायनी येथून विरारकडे जात असताना भिवंडी दरम्यान वाहतूक कोंडीमुळे आणि अपघातामुळे दोन्हीकडच्या बाजूसही वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे  समजल्यावर धनंजय गीध यांनी अपघाताच्या ठिकाणी पोचण्यास दिरंगाई होणार हे लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांच्याशी संपर्क साधून भरारी पथकातील पोलिसांच्या मोटासायकल वरुन घटनास्थळ पोहचले. 
          अपघाताच्या ठिकाणाचे प्रत्यक्ष परीक्षण केले असता धनंजय गीध यांना वाहनातून पडून विखुरल्या गेलेल्या सिलेंडर मधील काही सिलेंडरना गळती लागलेली आढळून आली आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातील दोन सिलेंडरनी पेट देखील घेतला होता. 
परिस्थिती अत्यंत भयानक आणि  गंभीर होती, कोणत्याही क्षणी भडका उडण्याची शक्यता होती, मात्र पूर्वानुभवावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून धनंजय गीध यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना सोबत घेत अत्यंत काळजीपूर्वकरीत्या परिस्थिती हाताळली आणि जवळपास १२  तासाच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यामध्ये त्यांना यश आले. 
       यावेळी एकेरी वाहतूक सूरू ठेवण्यासाठी सुद्धा यशस्वी प्रयत्न केले होते.यामुळे महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणेनेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी झाला होता.  अपघात घडल्यानंतर जवळपास १२  ते १५  तास आजूबाजूच्या परिसरातले लोक आणि प्रशासकीय यंत्रणा जणूकाही जीव मुठीत धरून होती. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामणी यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या धनंजय गीध आणि सहकाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळी येऊन केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन