पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अमोल घुटूगडे यांचा सत्कार, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने केला सत्कार
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ५ ऑगस्ट,
माण तालुक्यातील अमोल घुटूगडे यांनी पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांची भेट घेत त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि हेडाम हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,
माण तालूका हा दुष्काळी भाग असून येथील शेतकरी पुत्र अमोल घुटूगडे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले, कोरोनात त्यांची नोकरी गेल्याने त्यांनी थेट गाव गाठत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला,त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते कि माझा एक तरी मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली.
नुकताच पार पडलेल्या पीएसआय परीक्षेत त्यांनी राज्यात प्रथम येत घवघवीत यश मिळवले त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक बांधिलकी जपत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांच्या निवास स्थानी जावून शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि हेडाम हे पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला,
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सामाजिक कार्यकर्ते धनाजीराव विरकर, राहुल वीरकर, पोलीस पाटील संतोष सरगर, प्राध्यापक - सिद्धनाथ सरगर, बाजीराव करे, माया करे, दत्तात्रय घुटूगडे, कृषी मंडळ अधिकारी शिवाजी किशोर वाघमोडे,युनिव्हरसिटी कोल्हापूर रिसर्च सुहास सरगर, तलाठी भैरवनाथ घुटूगडे, सुमन घुटूगडे, ज्ञानदेव सरगर, केराबाई सरगर, मुक्ताबाई घुटूगडे पांडुरंग गावडे आदी उपस्थिती होते.
0 Comments