घोडीवली - अंजरुण पूल धोकादायक, प्रशासन व लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

 घोडीवली - अंजरुण  पूल, धोकादायक, रस्त्याची दुरवस्था ,प्रशासन व लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष 




पाताळगंगा न्युज : नवज्योत पिंगळे 
खालापूर / घोडीवली : ४ ऑगस्ट 

          खालापुर तालुक्यातील असलेल्या घोडीवली - अंजरुण पूल वाहतूकीसाठी,व प्रवासी वर्गांसाठी  धोकादायक बनला असून या पूलाच्या संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने निदर्शनास येत असून  हा पूल धोकादायक ठरत आहे.मात्र संबंधित प्रशासक,लोक प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे हा पुल गेल्या काही वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे.पावसाळ्यात या पुलांनी धोक्यांची पातळी ओळांडली असल्यामुळे या पुलावर धोक्यांचे सावट निर्माण झाले आहे.संबंधित प्रशासनाने हा पुल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
                घोडीवली, नावंढे अंजरुण या पुलावर या परिसरातील नागरिक सातत्याने प्रवास करीत असल्यामुळे दिवसेंदिवस या पुलाची दुरवस्था निर्माण झाली आहे. साधारण अडीच ते तीन हजाराहून अधिक लोकवस्तीची असलेल्या या गावांची सातत्याने या पुलावरुन रैलचैल सुरु असते.काही वर्षापूर्वी  नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील प्रवास सुखमय होत होते.मात्र आता हा पुल शेवटची घटका मोजत आहे.
            या पूलावरील क्रॉक्रीटीकन खराब होवून खड्डे पडल्याने,तलावांचे स्वरुप प्राप्त झाले.यामुळे हेच खड्डे  अपघाताला कारण ठरत आहेत. त्याच बरोबर दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती मोठ्या प्रमाणांत संभवत असल्यामुळे पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकरीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
             

 चौकट
      हा पूल गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे, परंतु या पुलाची अद्याप पर्यंत दुरुस्ती न झाल्याने प्रशासना विरोधात या ठिकाणचे वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. एकीकडे विकास कामांचा गाजावाजा झाल्याचे सत्ताधारी म्हणत असताना सर्व परिचित असणारा हा घोडीवली - अंजरुण पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहत असताना या पुलाची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे संबंधित विभागाने या धोकादायक पुलाचे गांभीर्य घेत या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी

सामाजिक कार्यकर्ते : सुधाकर काठावले 

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान