राजाराम जाधव,रेखा जाधव यांस अमेरिका या संस्थे कडून जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित

 राजाराम जाधव,रेखा जाधव यांस अमेरिका या संस्थे कडून जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार ने सन्मानित 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
वडवळ : १ सप्टेंबर

          शिक्षण आणि सामाजिक कार्यामध्ये अमुल्य योगदान असलेल्या व्यक्तींचा जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन(WCPA) यांचे जागतिक मुख्यालय अमेरिका येथे असून ही संस्था उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत असते.खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ येथिल शिक्षक राजाराम जाधव व त्यांच्या पत्नी रेखा जाधव राजिप शाळा माजगांव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.गेली अनेक वर्ष हे दोघे उभयंतास जागतिक संसद इंटरनॅशनल अवॉर्ड म्हणून श्रीरामपूर -शिर्डी,ता.राहता जि.नगर येथे सन्मानित करण्यांत आले.       

                   
                                                        ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवसांचे औचित्य साधत अमेरिका(USA)”जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार” “जागतिक संसद इंटरनॅशनल अवार्ड म्हणून यांस सन्मानित करण्यांत आले.गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांना घडविण्यांचे काम करीत असतांना,आजवर त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले आहे.शिक्षक म्हणजे ज्ञान- दान देण्यांचे काम करीत असते.त्यांनी केलेले शाळेमध्ये अमुलाग्र बदल,त्यांनी निर्माण केलेला विकास या सर्व बाबीचा अभ्यास करुन यांस सन्मानित करण्यांत आले. 


                          यावेळी या संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघवे, सचिव डॉ. शैलेंद्र भांगे,सचिव डॉ.रुषिकेश विघवे,कोषाध्यक्ष - चिंतामण भोसले,मिडीया हेड - महेश कांबळे,समन्वयक - विजया शिंदे,कायदेशीर सल्लागार डॉ.शहानूर सय्यद,अदि या सन्मान सोहळ्यांस उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर