पोलीस दलात दिनेश शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवाराच्या वतीने सत्कार

 पोलीस दलात दिनेश शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवाराच्या वतीने सत्कार 



पाताळगंगा :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १ सप्टेंबर,

             राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बबन शेडगे यांची निवड झाल्याने शेडगे परिवाराने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,दिनेशचे मूळ गाव हे दुर्गम भागातील चावणी हे असून दिनेशच्या घरची  अत्यंत गरिबी असून आई वडील मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिले, दिनेशनेही काही दिवस बिगारी काम तर काही दिवस सुरक्षारक्षकाचे काम करून आपले शिक्षण चालू ठेवले, 
               जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेश या परिस्थितीवर त्याने मात करत त्याने   खोपोलीतील शिवतेज अकॅडमीत पोलीस परीक्षेची   तयारी सुरु केली नुकताच पार पोलीस परीक्षेत त्याने घवघवीत  यश मिळवून राज्य राखीव पोलीस दल नवी मुबंईत त्याची निवड झाली, 
            त्याच्या या निवडीने समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून आज शेडगे परिवाराने त्यांची घरी जाऊन भेट घेत त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,
           यावेळी भाजपा मावळ तालूका  धनगर विकास परिषदेचे अध्यक्ष  नामदेव शेडगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम शेडगे, राजेश शेडगे, संतोष शेडगे, सुरेश शेडगे, मारुती शेडगे, गणेश आखाडे दत्ता शेडगे, संदीप शेडगे, बबन शेडगे, शुभम शेडगे, उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण