विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवात घरी साकारली राजिप शाळा वडगावची प्रतिकृती
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : १२ सप्टेंबर
ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माउली बाळा या पंक्तीच्या माध्यमातून राजिप शाळा वडगाव येथे शिक्षण घेत असलेले स्वराली घोरपडे हिने आणी तीचे वडील अनंता घोरपडे गणपती उत्सवाच्या निमित्ताने या शाळेची प्रतिकृती निर्माण करुन मराठी शाळा जोपसण्यांचा संदेश या माध्यमातून देण्यांत आला.या देखाव्यात शाळा त्या ठिकाणी असलेल्या सर्व बाबीचा अभ्यास करुन साकारण्यांत आल्यामुळे बाप्पाचे दर्शन घेण्यांसाठी आलेले भक्त गण या स्वराली चे कौतुक करीत आहे.
गणपत्ती च्या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक जण गणपतीची आरास उत्तम प्रकारे करीत असतात.या शाळकरी मुलीने आपण या शाळेमध्ये शिक्षण घेत असतांना आपण आपल्या बाप्पाला या शाळेमध्ये विराज मान करता आले नसले तरी सुद्धा आपण या शाळेची प्रतिकृती निर्माण करुन गणपतीची स्थापना केली.विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी ही आरास पाहताच या मुलीचे कौतुक केले.
राजिप शाळा वडगाव येथे सुसज्य अश्या सेवा सुविधा विद्यार्थ्यास मिळत आहे.यामुळे या शाळेचा पट सातत्याने वाढत आहे.यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण झाली.आपण दहा दिवस शाळेत जावू न शकलो तरी सुद्धा या गणपती ची केलेली आरास पाहून आपल्याला आपण शाळेत असल्याचा भास निर्माण करुन देत असल्यांची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
0 Comments