उरण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे महेंद्र घरत प्रबळ दावेदार,हा मतदार संघ काँग्रेसला द्यावा - कार्यकर्त्यांची मागणी...

 उरण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे महेंद्र घरत प्रबळ दावेदार,हा मतदार संघ काँग्रेसला द्यावा - कार्यकर्त्यांची मागणी...



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ९ सप्टेंबर,

      उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हे प्रबळ दावेदार असून हा मतदार संघ कॉग्रेसला द्यावा अशी मागणी यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे झोपडपट्टी व जिंर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनी केली आहे. 
            आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी चालू केली असून या मतदार संघावार काँग्रेसने दावा ठोकला आहे,असून हा मतदार संघ कॉग्रेसला मिळावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी केली आहे.
          उरण विधानसभा मतदार संघ हा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता असल्याने महाविकास आघाडीत हा मतदार संघ कॉग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरु आहेत, 
                 कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष  कामगार नेते महेंद्र घरत यांचा या मतदार संघावर मजबूत पकड असून दांडगा जनसंपर्क आहे, तर उरण मतदार संघात घरत यांना  मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे, त्यांनी कॉग्रेसची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत,या उरण मतदार संघातून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी मिळाली तर ते या मतदार संघातून नक्कीच निवडून येतील असा यासाठी झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक शंकर पाटील यांनी केला आहे,  जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात