संतोष पवार यांना वाचवू शकलो नाही याचे दुःख:-डॉ.ओमप्रकाश शेटे

 संतोष पवार यांना वाचवू शकलो नाही याचे दुःख:-डॉ.ओमप्रकाश शेटे




पाताळगंगा न्युज :अजय कदम
माथेरान : १४ सप्टेंबर ,

             कोरोनाकाळात अनेक रुग्णांना आधार दिला.अनेक फोन आले, खाटा कमी रुग्ण जास्त अशी परिस्थिती होती.त्यावेळेस रुग्णांना धीर देत त्यांचे जीव वाचविण्यात यश आले.पण त्याच वेळेस संतोष पवार यांना कोरोनात वाचवू शकलो नाही,त्याचे दुःख आहे. असे प्रतिपादन आयुष्यमान भारत समिती प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी माथेरान मध्ये झालेल्या कार्यक्रमात केले.यावेळी मंचावर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे,कार्याध्यक्ष रायगड प्रेस क्लब - प्रशांत गोपाळे,स्व.संतोष पवार यांच्या पत्नी मनीषा पवार,सपोनि अनिल सोनोने मंचावर उपस्थित होते.
                  ते पुढे असे ही म्हणाले की,काही वेळा कागदपत्र न पाहता रुग्णाला वाचविण्यासाठी पहिले प्राधान्य दिले.मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख म्हणून काम करत असताना अनेक रुग्णांना आधार दिला पण काही रुग्णांना मदत करू शकलो नाही याचे शल्य अजूनही आहे.लाखो रुग्णांना मदत केली.माथेरानच्या वातावरणात स्वर्गाभास होतो त्यामुळे इथे येण्यासाठी कुणीही नकार देऊच शकत नाही असे ही गौरउदगार त्यांनी काढले.२०२० च्या कोरोनाच्या कटू आठवणी अजूनही सतावतात.
           माथेरान प्रेस क्लब आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा पारितोषिक सोहळा शुक्रवार दि.१३  सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता हॉटेल रंगोली येथे घेण्यात आला.जेष्ठ पत्रकार स्व.संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.त्यांच्या स्मृती ना उजळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या प्रसंगी आयुष्यमान भारत समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचा,मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांचा नागरी सन्मान करण्यात आला.
          शिक्षण क्षेत्रात अनमोल काम करणाऱ्या निवृत्त शिक्षक सुनील गंगाराम कदम,सुनील रामचंद्र शिंदे,योगेश जाधव या शिक्षकांचा तर सामाजिक क्षेत्रात काम करणाच्या पुष्पा काशिनाथ केरेकर यांचा सुद्धा नागरी सन्मान करण्यात आला.गणेश सजावट स्पर्धेत उत्कृस्ट सजावट,सुबक मूर्ती,गौरी सजावट विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी माथेरान प्रेस क्लब अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,दिनेश सुतार,चंद्रकांत सुतार,चंद्रकांत काळे,मिलिंद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण