माथेरानमध्ये आयुष्यामान भारत (गोल्डन)कार्ड शिबीरांचे आयोजन शेकडो नागरिकांना घेतला लाभ

 माथेरानमध्ये आयुष्यामान भारत (गोल्डन)कार्ड शिबीरांचे आयोजन शेकडो नागरिकांना घेतला लाभ




पाताळगंगा न्युज : अजय कदम 
माथेरान : १४ सप्टेंबर,

         माथेरान प्रेस क्लबच्या वतीने तसेच डॉ.ओमप्रकाश शेटे याच्या संकल्पनेतून माथेरानमध्ये प्रथमच भव्य आयुष्यमान भारत (गोल्डन)कार्डचे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला माथेरानमधील स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
                 स्व.संतोष पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या शिबिराचे आयोजन हॉटेल रंगोली येथे केले करण्यांत आले.यावेळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कर्जत तहसील मधील कर्मचारी वृंद या शिबिरात सहभागी झाले होते. लॅपटॉप च्या सहाय्याने एकाचवेळी १२ लोकांना कार्ड मिळत होते.जिल्हाधिकारी कार्यालयाचे सी.एस.सी.जिल्हा व्यवस्थापक अक्षय गिरी यांच्या प्रयत्नातून हे शिबीर संपन्न झाले.एकूण २५ लोकांचा स्टाफ याकामी लागलेला दिसून आला.डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी स्वतः या शिबिराची पहाणी केली.४५० पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराला भेट दिली.
               ज्यांचे कार्ड तयार झाले त्यांना डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शिबीर झाल्याने असे शिबीर माथेरानमध्ये कधीच झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण