बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : २० सप्टेंबर,
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि रायगडचे मा.पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष खालापूर तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य सरकार मधील वजनदार आणि कार्य कुशल सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. रायगड हॉस्पिटल आणि ब्लड बँक कर्जत यांच्या सहकार्याने चौक येथील जेष्ठ नागरिक सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उत्तर रायगड भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, सरपंच रितू ठोंबरे,चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, माजी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, गणेश मुकादम, दर्शन पोलेकर, तुपगाव सरपंच रविंद्र कुंभार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments