नवरात्र उत्सव शांततेने साजरा करा,पो.नि.सचिन पवार,उप.वि.अधि.विकम कदम यांचे पोलीस पाटील यांस मार्गदर्शन

 नवरात्र उत्सव शांततेने साजरा करा,पो.नि.सचिन पवार,उप.वि.अधि.विकम कदम यांचे पोलीस पाटील यांस मार्गदर्शन 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर  : २६ सप्टेंबर, 

           नवरात्र उत्सव हा सार्वजनिक असल्यामुळे मोठ्या उत्सहाने साजरा होत असला तरी सुद्धा या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी खालापूर पोलीस निरिक्षक सचिन पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी-विकम कदम यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील असलेले पोलीस पाटील यांना नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून शासनाने नवरात्रोत्सव साजरा करणे बाबतच्या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत मा‌. उच्च न्यायालय यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर सूचना,आवाजाची पातळी किती असावी याबाबत माहीती देण्यात आली.
                 यावेळी ते पुढे म्हणाले की मूर्ती विटंबना होणार नाही, यासाठी २४ तास स्वयंसेवक नेमण्यात यावेत.तसेच मंडप मजबूत असावे, मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, कायदेशीर विद्युत जोडणी असावी, ऑनलाइन परवानगी अर्ज करावा, तसेच संबंधित विभागाच्या परवानगी घ्यावी, गरबा दांडिया खेळताना सदर ठिकाणी मुलींची छेडछाड विनयभंग, चोरी, मद्य प्राशन करून गरबा खेळणे, नवरात्रौत्सवामध्ये जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणारे बॅनर, देखावे, चित्रफिती प्रसारित करू नये.याबाबत मंडळानी दक्षता घ्यावी,तसेच स्वयम सेवेक नेमवावे,आश्या विविध सूचना यावेळी केल्या.
            उत्सव कोणताही असो मात्र एकत्र साजरा करण्यांची परंपरा आज ही ग्रामीण भागात जपली जात आहे.मात्र त्या उत्सवांच्या माध्यमातून कोणतेही गाळ बोट लागणारा नाही यांची जाबाबदारी मंडळ यांनी घेतली पाहिजे, उत्सव साजरे करा,मात्र पर्यावरण पुरक शांततेने आणी आणी शासनांच्या नियमांचे पालन करुन असे आवाहन यावेळी पोलीस पाटील यांना करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव