जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.संपामध्ये १४७ शिक्षकांचा सहभाग



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
आलिबाग  : २५ सप्टेंबर,

        शिक्षक म्हणजे ज्ञानांचा दिवा,विद्यार्थ्यांचे अंधारमयातून प्रकाशाकडे घेवून जाणारे  गुरु,आजच्या पिढीचे भविष्य निर्माण करणारे गुरुजी मात्र शासनाने घेतलेल्या निर्णय मान्य नसल्यामुळे या मध्ये अनेक तुटी निर्माण झाल्यामुळे आज रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा वळविला, यामुळे सर्व शिक्षकांनी आज संपावर जाण्यांचा निर्णय घेतला.यामुळे आज सामूहीक  शाळा बंद आंदोलन करण्यांत आले. वेळ पडल्यास आझाद मैदान येथे आंदोलन करण्यांची अक्रमक भुमिका यावेळी संपावर गेलेल्या शिक्षकांनी घेतली.

          रायगड जिल्ह्यात एकून १८० शाळा असून ३६४ शिक्षक आहेत.मात्र या संपामध्ये १४७ शिक्षक या संपामध्ये सहभागी झाल्यांचे पहावयांस मिळाले.यावेळी तालुक्या सह जिल्हातील शाळा बंद ची हाक घेण्यांत आली.शिक्षकांच्या विविध दिलेल्या मागणीची पुर्तता झाली नाही तर आम्ही कायम संपात सहभागी राहणार असून, जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत,तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन सुरूच ठेवून शासनाची कोंडी करू.अश्या तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

           
               * शिक्षकांच्या विविध मागण्या *

  १ )  १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.     

२)  २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा.

३)विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. 

४) सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व सन २००४ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी  लावावा.

५) १ नोव्हेंबर २००५नंतर सेवेत लागलेल्या   स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक  शिक्षकांना/ शासकीय कर्मचाऱ्याना १९८२ ची पेन्शन आदेश निर्गमित करावेत

६) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावेत. २०२४-२५ वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी.
अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत.  पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.
 
चौकट 
        
आज शाळा बंद सामूहिक राजा आंदोलन केलं होतं. यापुढे आझाद मैदान गाठण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही.शासनाने आमच्या मागण्यांचा जर विचार केला नाही तर आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहून 
  रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने - रोशन तांडेल

चौकट 

 हे आंदोलन सर्व शिक्षक संघटनांचा होता.त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या शासन नक्की विचारात घेईल व न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही.अन्यथा सर्वानुमते जे ठरेल त्याप्रमाणे पुढे लढा सुरू ठेऊ. उपाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना : सुभाष राठोड,





Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर