स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव पदी प्राध्यापक ऊत्तमराव गलांडे यांची निवड,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने केला सत्कार
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३ सप्टेंबर,
न्यू इंग्लिश स्कुल आणि जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक उत्तमराव गलांडे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव पदी निवड झाल्याने त्यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघांचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांचा सत्कार केला,
न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज जोहेचे प्राध्यापक असलेले उत्तमराव गलांडे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुबंई ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्याच्या सचिव पदी नुकतीच निवड झाली.
त्यांची निवड होताच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, यांनी त्यांची भेट घेत त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी ज्योतिलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुबंईचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे, ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे, शिक्षक पन्हाळकर, कारंडे, पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments