सावरोली खारपाडा मार्गावर अपघात टाळण्यासाठी दिलासा फाऊंडेशनचा पुढाकार. खालापूर पोलीस ठाण्यात कॅनकेव्ह मिरर भेट.
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ३ सप्टेंबर,
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दिलासा फाउंडेशन खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघातस्थळ असलेल्या ठिकाणी कॅनकॅव्ह मिरर( बहिर्गोल आरसा) बसविण्यात येणार आहे.मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने दोन कॅनकॅव्ह मिरर भेट देण्यात आले.
रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात.मोफत हेल्मेट वाटप, रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती साठी चित्रकला ,पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक बसवण्यात आले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून सावरोली खारपाडा मार्गावर खरसुंडी आणि पौध हद्दीत बसविण्यात येणार आहे.
मंगळवारी खालापूर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नरेंद्र ढोके, संगीता घाटवळ,पुंडलिक लोते, पत्रकार दिपक जगताप, दिनेश पाटील,दत्ता शेडगे,प्रसाद अटक
अभिजित दरेकर, संकेत घेवारे, सचिन भालेराव, तुषार बनसोडे , ग्रामस्थ पुंडलिक लोते ,उमेश पडवकर, साहिल सावंत, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी ,ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश राणे यांनी केले सर आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी मानले.
0 Comments