आत्करगाव ग्राम पंचायतीच्या उप सरपंचपदी रोहिणी देशमुख यांची बिनविरोध निवड

 आत्करगाव ग्राम पंचायतीच्या उप सरपंचपदी रोहिणी देशमुख यांची बिनविरोध निवड



पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ३ सप्टेंबर,

         आत्करगांव ग्रुप ग्रामपंचायत उप सरपंचपदी 
एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या रोहिणी देशमुख यांची बिनविरोध करण्यात आली आहे.देशमुख यांची बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला आहे.हा कार्यक्रम खेळी मेळीच्या वातावरणात ग्राम पंचायतीच्या कार्यालयात पार पडला .
             खालापूर तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या आत्करगाव ग्राम पंचायतीचा विकास करण्यासाठी 
पंचवार्षिक निवडणूकीत भाजपचे नेते संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप,शिंदे गट,मनसे,आरपीआय पक्षांना एकत्रित करीत एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीचा स्थापना केली.त्यानंतर निवडणुकीत थेट सरपंचपदी शर्मिला भोईर यांच्यासह आठ सदस्य निवडून आणत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.यादरम्यान उपसरपंचपदी गणेश पाटील निवड करण्यात आली होती.गणेश पाटील यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.यादरम्यान रोहिणी देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांची बिनविरोध करण्यात आली.
          निवडणूकीत पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच शर्मिला भोईर यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी काम पाहिले.मा.उपसरपंच गणेश पाटील,सदस्य कविता चोनकर, साधना पडवळ, गीता देशमुख, मेघना देशमुख, विजय वाघमारे, दत्तात्रये वाघमारे, अविनाश शिंदे तसेच संदीप तातुराम पाटील, शिवाजी पाटील,समीर देशमुख, हेमंत पाटील, सुभाष पाटील, संतोष पाटील, संदीप चोनकर, संदीप पाटील, सदाशिव देवकर,नितीन भोईर, निलेश पाटील, जयेश तवले, पंढरीनाथ तवले, मनोहर शिंदे, धर्मा लाड, संतोष वाघमारे, तानाजी पाटील, गजानन पाटील, नयन पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
   
 चौकट -
      ग्राम पंचायतमधील सर्व गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वांचे सहकार्य वेळोवेळी लाभत आहे. तर काही सदस्यांना उप सरपंच पद मिळावे यासाठी ठराविक कालावधी देवून प्रथा सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने मी माझ्या उप सरपंच पदाचा राजीनामा देत नव्याने रोहिणी अनिल देशमुख यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
   मा. उपसरपंच:  गणेश पाटील 
   
चौकट -
        उप सरपंचपदावर बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार,भविष्यात गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असून महिलांसाठी शासनाच्या असलेल्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
   विद्यमान उपसरपंच : रोहिणी अनिल देशमुख
    - 

  चौकट -
   ग्राम पंचायतीचा सर्वागीण विकास करण्यासाठी आमचे नेते नरेश पाटील,संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असतानाच आत्करगांव ग्राम पंचायतीत विकास आघाडी केली आहे.
   मा.  उप सरपंच आत्करगांव ग्रामपंचायत :  समीर देशमुख

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार