ज्यांना आमदार केले त्यांनी शिवसेनेचे कार्यालय पळून नेले..... उपनेते सचिन अहिर

 ज्यांना आमदार केले त्यांनी शिवसेनेचे कार्यालय पळून नेले..... उपनेते सचिन अहिर 


(ज्यांच्या सोबत आहेत त्यांनीच बंड पुकारल्यामुळे चांगलीच अडचण निर्माण झाली आहे.... आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता टिका)



पाताळगंगा न्युज :  हनुमंत मोरे 
खोपोली : ५ सप्टेंबर,

            आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना (उबाठा) गटाचा आमदार भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी खोपोली येथील शिवसेना (उबाठा) कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे.ते पुढे असे म्हणाले की ज्यांना आमदार केले त्यांनी शिवसेनेचे कार्यालय पळून नेले, ज्यांच्या सोबत त्यांची मैत्री जुळली आहे ते त्यांच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिल्यामुळे फुटीरवाद्यांची चांगलीच गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात कर्जत विधानसभा मतदारसंघातून शिवसेना(उबाठा)चा बोलबाला झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.या मतदारसंघातील सुज्ञ मतदार गद्दारांना काढल्याशिवाय राहणार नसल्याची टीका शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता केली आहे.
                शिवसेना (उबाठा) गटाच्या खोपोली येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उपनेते सचिन अहिर,मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची ज्यांच्या खांद्यावर शिवसेना (उबाठा) गटाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे ते शिवसेनेचे खांदे कार्यकर्ते नितीन दादा सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाचे चांगलेच प्रस्थ उभे करण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
              दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला सतरा हजाराचे मताधिक्य अधिक मिळवून देण्यात शिवसेना(उबाठा) यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून या विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचा बोलबाला चालेल असे शिवसेना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.शिवसेना (उबाठा) गटाने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.यासाठी खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेची जोडले जावे यासाठी नितीन दादा सावंत यांनी खोपोली येथे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे.या कार्यालयाचा शुभारंभ नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

___ एकत्र आलेल्यांमध्ये वाद सुरू झाले----
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले असल्यामुळे ते आता भाजपा, राष्ट्रवादी(अजित पवार गट)यांच्या सोबत असले तरी राष्ट्रवादी गटाने या विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केल्याचे पहायला मिळत आहे. राज्याच्या सरकारमध्ये एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.यावरून यांच्यात अंतर्गत वाद किती आहेत हे स्पष्ट होते.हा वाद आगामी विधानसभा निवडणुकीत किती परिणामकारक होईल याची चर्चा आपण न केलेली बरी आम्ही आमचा उमेदवार उभा करून तो निवडून आणणारच असल्याचे शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी सांगितले.

____ अद्याप उमेदवार ठरला नाही,पक्ष देईल तो उमेदवार ----अद्याप कोणताही उमेदवार शिवसेना (उबाठा) गटाकडून निश्चित झाला नसला तरी या विधानसभा मतदारसंघात आमचा उमेदवार कोण असेल तो लवकरच जाहीर केला जाईल.मात्र आम्ही निवडणूक घडविण्यासाठी व ती जिंकण्यासाठी समर्थ आहोत.

____ सुधाकर घारे यांना आशावाद ----
शिवसेनेने अद्याप आपला उमेदवार ठरविला नसल्यामुळे या मतदार संघातून शिवसेना(उबाठा) गटाला कोणत्याही परिस्थितीत विजय हवा असल्याने मतदार संघाच्या राजकीय भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शर्यत जिंकणाऱ्या घोड्यालाच मैदानात उतरले जाते या निकषांवर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश देऊन निवडणूक लढविण्याची संधी दिली जाऊ शकते?अशी चर्चा विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार