खोपोली शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार,आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणाली विश्वास ठेवून पक्ष प्रवेश
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ६ सप्टेंबर,
बाळासाहेब भवन,जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे नुकताच पक्षप्रवेश सोहळा पार पडला.आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास खोपोली शहरातील पहिल्या हाल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खोपोली उपशहर प्रमुख तौफिक पटेल यांच्यासह विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अक्तर मुल्ला. ईम्रान वंडे,इरफान मुकादम,तारिक जळगावकर,नाजिम जळगावकर,गुफ्रान मुल्ला,अलि कुरेशी,साजिद सोंडे, अर्जुनओव्हाल,शोयेब धनसे,आतिफ बेडेकर,मुकरम अन्सारी,फय्याज मुकरि,मजिद करजीकर,मोविन बेडेकर,अनेक पदाधिकाऱ्यांनी यांनी पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार थोरवे बोलताना म्हणाले की शिवसेना पक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला पक्षामध्ये योग्य तो मानसन्मान दिला जातो. व मी सदैव खोपोलीकरांच्या विकासासाठी कटिबंध आहे अशा प्रकारचा शब्द दिला.पक्ष प्रवेश करणा-यांची मने जिंकली
याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमु संतोषजी भोईर, खालापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख- भाऊ सणस,उप शहर प्रमुख खोपोली शहर मोहसिन खान,राजु खांडेकर तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments