निबंध स्पर्धा, व्याख्यान,माहितीचा अधिकार,संकट समयी महिला वर्गांस स्व:रक्षाचे धडे, खालापूर पोलीसांचा स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
चौक : २९ सप्टेंबर,
सरनौबत नेताजी पालकर विदयामंदीर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविदयालय चौक या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना,आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार या दिनांचे औचित्य साधत निबंध स्पर्धा, व्याख्यान अदि उपक्रम खालापूर पोलीस ठाणे कडून हाती घेण्यात आला.यावेळी माहिती अधिकार समवेत मुलींना स्व:रक्षाचे धडे गिरविले आले.
शालेय शिक्षण घेत असतांना किंवा आपण प्रवास करीत असतांना कोणतेही संकट आल्यास आपण न घाबरता ध्येयांने त्या संकटांना सामोरे गेले पाहिजे यावेळी शिक्षीका, कॉलेजमधील मुली यांना संकटकाळात महिला, मुलींनी काय केले पाहिजे याबाबत माहिती देवुन त्यांचे मनोबळ वाढविले.स्वप्नाली पवार यांनी पोलीस काका, पोलीस दीदी यांनी डायल ११२ , महिलांसाठी आपात्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती देण्यांत आली.
तसेच सपोनि मनिष मोरे व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाळ यांनी माहिती अधिकार दिनाचे महत्व व त्याचा त्यांचे जीवनात होणारे उपयोग बाबत मार्गदर्शन केले.यावेळी सपोनि मनीष मोरे,गोपनीय विभागाचे दिनेश भोईर, समीर पवार,सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे,योगेंद्र शाह, मुख्याध्यापक बोंबले सर, कुंभार सर व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments