परतीच्या पावसांने भात शेतीच्या समवेत, गुरांचा बेड्याचे मोठे नुकसान

 परतीच्या पावसांने भात शेतीच्या समवेत, गुरांचा बेड्याचे मोठे नुकसान



पाताळगंगा : न्युज : वृत्तसेवा 
तळवळी : २९ सप्टेंबर,
     
                         हस्त नक्षत्र सुरु झाल्यापासून शेतकरी वर्गांचे तोंडचे पाणी पळाले असून शेतकरी हवालदींन झाला आहे.मात्र दर वर्षी प्रमाणे हा परतीचा पाऊस शेतकरी यांच्या मुळावर उमठतं असल्याचे दृश्य पाहावयांस मिळत आहे.शेती दाण्याने बहरली असून मात्र आता ती माती मोल होत असल्याचें पाहावयास मिळत आहे.त्याच बरोबर ह्या परतीच्या पावसाचा फटका तळवळी येथिल शेतकरी देविदास मालकर यांस बसला असून त्यांच्या घरच्या पाठीमागे असलेला गुरांचा वाडा या परतीच्या पावसाने पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
 सुदैवाने या वाड्यात गुरे नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
           सायंकाळी होताच अचानकपणे येत असलेला हा परतीचा पाऊस,घरामधिल राहत असलेले गृहस्थांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे.घराच्या पाठीमागे असलेल्या या बेडा हा कौलारु असून त्याच बरोबर या बेड्याला उत्तम प्रकाराचे लाकूड असल्यामुळे हा पडल्यामुळे सर्व लाकूड कुजून गेल्यांचे असल्यामुळे आता उभारण्यांसाठी लाकूड कोठून आणावे हा मोठा प्रश्न सध्या शेतकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. 
                ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी वर्गांची स्थिती अतिषय बिकट असून घर खचला अथवा पावसामुळे पडले तर ते दुरुस्ती करण्यासाठी ऐवढे सक्षम नसतात. शिवाय शासनाची मदत ही वेळेवर पोहचत नसल्यामुळे  आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा असा प्रश्न नेहमीच निर्माण होत असतो.यामुळे  झालेल्या वाड्याची  तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावे अशी मागणी देविदास मालकर यांनी प्रतिनिधी बोलतांना सांगितले. 
              
          

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप