पोलीस दलात दिनेश शेडगे यांची निवड झाल्याने सत्कार

 पोलीस दलात दिनेश शेडगे यांची निवड झाल्याने  सत्कार 

     

पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २ सप्टेंबर,

            राज्य राखीव पोलीस दलात दिनेश बबन शेडगे यांची निवड झाल्याने राष्ट्रीय समाज पक्ष खालापूरचे उपाध्यक्ष आनंद भगवान ढेबे,सामाजिक कार्यकर्ते भगवान कोंडीबा ढेबे,गणेश ढेबे यांनी घरी जाऊन सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
               दिनेशचे मूळ गाव हे दुर्गम भागातील चावणी हे असून दिनेशच्या घरची  अत्यंत गरिबी असून आई वडील मिळेल ते काम करून दिनेशला शिक्षण दिले, दिनेशनेही काही दिवस बिगारी काम तर काही दिवस सुरक्षारक्षकाचे काम करून आपले शिक्षण चालू ठेवले, 
           जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर दिनेश या परिस्थितीवर त्याने मात करत त्याने खोपोलीतील शिवतेज अकॅडमीत पोलीस परीक्षेची   तयारी सुरु केली नुकताच पार पोलीस परीक्षेत त्याने घवघवीत  यश मिळवून राज्य राखीव पोलीस दल नवी मुबंईत त्याची निवड झाली, 
         त्याच्या या निवडीने समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष आनंद ढेबे यांनी   दाखल घेतली    त्यांची घरी जाऊन भेट घेत त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष खालापूर तालूका उपाध्यक्ष आनंद भगवान ढेबे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कोंडीबा ढेबे, गणेश ढेबे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात