सोमवती अमावस्या निमित्ताने संत श्री बाळूमामा मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २ सप्टेंबर
आज सोमवती अमावस्या असल्याने लोणावळा पांगोळी येथे असलेल्या संत श्री बाळू मामा देवाच्या मंदिरात भक्तांची दर्शन घेण्यासाठी रेलचेल सुरु असल्यांचे पहावयांस मिळाले.
अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळू मामा देवाचे मंदिर हे लोणावळा पांगोळी (धनगरवस्ती )येथे आहे, या मंदिरात आज सोमवती अमावस्या असल्याने सकाळ पासून या मंदिरात मामांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती,
मुबंई आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्याने अनेक ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येत असतात, या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्यांची व्यवस्था संत श्री बाळू मामा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली होती, तर रोजच या मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक भक्त येत असल्याचे देवस्थान विश्वस्त ट्रस्ट प्रमुख बबन खरात यांनी सांगितले.
0 Comments