राजिप शाळा वडगाव येथे प्लास्टिक मुक्त अभियान
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : ३ ऑक्टोबर,
रायगड जिल्हा परिषद,तथा उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.यावेळी वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व स्वच्छ भारत ,प्लॅस्टिक मुक्त भारत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.या उपक्रमांतर्गत टाकवू वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, यामध्ये प्लॅस्टिक संकलन व वर्गीकरण तसेच पुनर्वापर याविषयी मार्गदर्शन करण्यांत आले.
विद्यार्थांस कुठेही प्लॅस्टिक दिसला तर तो शाळेत आणणे व त्यावर प्रक्रिया करून त्यापासून वस्तू बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.यावेळी वक्तृत्व स्पर्धेच्या व चित्रकला स्पर्धेत विजयी व सहभागी विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा करुणा रवींद्र ठोंबरे,उपाध्यक्ष,राजश्री नरेश जांभुळकर, मुख्याध्यापक- सुभाष राठोड,उप शिक्षक वैजनाथ जाधव,स्वयं सेविका निकिता गडगे व भाग्यश्री तांबोळी तर पालक वर्गातून जयेश पाटील,गणेश मुंढे अदि उपस्थित होते.
चौकट :
प्लास्टिक संकलनातून त्याचे वर्गीकरण करून त्यापासून शोभेच्या वस्तू, फुलदाण्या,रोपवाटिका तसेच त्यांच्या भाज्यांची लागवड करून त्यांपासून उत्पन्न घेण्याचे नियोजन करण्यांत आले.यामुळे मुलांमध्ये उत्पादक क्षमता,चिकित्सक विचार व पुनर्रवापराचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.
मुख्याध्यापक शाळा वडगाव - सुभाष राठोड ,
चौकट :
राठोड सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच स्वच्छतेला पूरक असून नाविन्यपूर्ण आहे.
पालक वडगाव - जयेश पाटील
0 Comments