गो पालन,सेंद्रिय शेती करुन आपले आरोग्य क्रांतीमय बनवा : अरुण पाटील

 गो पालन,सेंद्रिय शेती करुन आपले आरोग्य क्रांतीमय बनवा  : अरुण पाटील

   पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा                                               तांबाटी : ४ ऑक्टोबर,




              आपल्या जिवनात गो पालनांचे खूप महत्व आहे.पुर्वी मोठ्या प्रमाणात गो पालन होत होते.मात्र आता अल्प प्रमाणात पहावयांस मिळत आहे.गाई पासून आपणांस दुध,शेण,गोमूत्र हे सर्व मानव आरोग्यासाठी मोठे वरदान आहे.मात्र आज जास्त दुध देण्यासाठी जर्शी गाई सांभाळ केला जातो.मात्र प्रत्येकांनी देशी गाई सांभाळा.त्याच बरोबर सेंद्रिय शेती करण्यांस भर द्या.यामुळे जमिनीची प्रत वाढत जाईल आणी आपण निरोगी राहण्यांस मदत होईल असे मत अरुण पाटील सिद्धगिरी मठ संस्थान कणेरी मठ कोल्हापूर यांनी शेती विषयी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन ग्रूप ग्राम पंचायत तांबाटी येथिल सभागृहात  आयोजन करण्यात आले.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात बोलतांना व्यक्त केले.                                                                           ग्रूप ग्राम पंचायत तांबाटी यांस नुकताच भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या ५ घटकांवर आधारावर अंतर्गत २ हजार ५०० ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या गटात खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात ७ वा क्रमांक मिळविला तसेच,५० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे.या निमित्ताने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत शेतक-यांसाठी शेती विषय मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यांत आले.गोशाळा संगोपन,शाश्वत जीवन प्रणाली विषयुक्त असणारी शेती,या विषयी मार्गदर्शन करण्यांत आले.                                                                 यावेळी  ग्रूप ग्राम पंचायत तांबाटी सरपंच - अविनाश आमले,ग्रामसेवक - प्रशांत कदम,उप सरपंच - शितल पाटील,सदस्य संतोष दळवी,नितिन कदम,सुरेश पवार,अरुणा सावंत,कृषी अधिकारी आंधळे,सुख कर्ता ॲग्रो प्रोड्यूस कं. - सुभाष मुंढे,स्मरण कृषी फॉर्मर - राजेश पाटील,शिवशाहीर - मुगरम,तबलावादक - अवधुत,शेतकरी साळुंखे,निलेश कदम,अर्पिता पाटील - परखंडे अदि उपस्थित होते.                      

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन