ओला दुष्काळ जाहीर करा,वरद विनायक शेतकरी सामाजिक संंस्थेचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

 ओला दुष्काळ जाहीर करा,वरद विनायक शेतकरी सामाजिक संंस्थेचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन 




पाताळगंगा न्युज :  हनुमंत मोरे
खोपोली/ वावोशी : २१ ऑक्टोबर,

             हातातोंडाशी आलेले पिक सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त होत चालले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.सध्या दररोज संध्याकाळी जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.यंदाचे नुकसान शेतकऱ्याला सहन करण्यापलीकडचे असल्याने शासनाने यांची तात्काळ दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खालापूर तालुक्यातील वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्थेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
                  खालापूर तालुक्यातील वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे शासन दरबारी झगडताना दिसत आहे.या संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुनील रघुनाथ पाटील(खानाव),मंगेश खंडू धामणसे (खानाव),खंडू शिवराम पाटील (उंबरे),हनुमंत मोरे(शिंदीवाडी परखंदे) यांनी आज दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खालापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी खालापूर तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर व विमा प्रतिनिधी अरुणा रिंगे यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर