गावदेवी भवानी माता वडगांव येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने रंगली देवीची गाणी,वासुदेव जाधव यांचा पुढाकार
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : ६ ऑक्टोबर,
नवरात्र हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जात असतांना ह्या उत्सवाच्या निमित्ताने देवीची आराधना समवेत,भजन सुरु असून,वडगाव येथे असलेली आई गावदेवी भवानी मातेची अति प्राचिन मुर्ती असून,सुंदर असे मंदिर या ठिकाणी बांधले आहे.या उत्सवाच्या निमित्ताने देवीची जोडे गाणी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले.हातनोली आणी तुराडे यांनी उत्तम आशी गाणी गात देवीला मानवंदना देण्यांत आली.या कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आले.तसेच मा.सरपंच एम.के.गडगे यांच्या सहकार्य लाभले.
ह्या देवीची गाणी ऐकण्यासाठी या पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.वासुदेव जाधव हे सातत्याने सामाजिक,राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असून सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे.यासाठी त्यांनी स्वताला झोकून दिले आहे.या परिसरात होत असलेल्या विविध कार्यक्रमास ते सक्रिय असून ते सातत्याने सहकार्य करीत असतात.आज यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी यात्रे सारखे स्वरुप प्राप्त झाले होते.
यावेळी हातनोली येथिल गुरुवर्य : विष्णु पिंगळे शाहीर - लक्ष्मण पिंगळे,ढोळकी वादकः लक्ष्मण वाळक कोंडीलकर ' पिंट्या कडवे, छडीवादकः-गंगाराम गणपत ठोंबरे' धनाजी कृष्णा पिंगळे विनोद सावंत साथकरीः-ग्रामस्थ मंडळ व बाळगोपाळ मंडळ या ठिकाणी उपस्थित होती.
तसेच तुराडे येथिल गुरुवर्य : कै: काशिनाथ दळवी,शाहीर - अमोल दळवी, ढोलकी वादक - सुरेश दवी, जितु दवी,हरिष मालुसरे, छडीवालेः बबन शेडगे, सजंय दळवी, बबन मते,साथकारीः- ग्रामस्थ मंडळ या देवीची गाणी गात होते.या कार्यक्रमावर पंच कमिटी म्हणून एकनाथ पाटील, हरी गडगे, राजा जांभुळकर,खडूं गडगे, कृष्ण पाटील, रघु म्हात्रे, शंकर गडगे, रमेश म्हस्कर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments