उरण विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेसच्या महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी.

 उरण विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेसच्या महेंद्र घरत यांना उमेदवारी द्यावी. 

   कॉग्रेस  अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्ष अखलाख भाई शिलोत्री यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांची भेट घेत केली मागणी....


पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ५ ऑक्टोबर,


           उरण विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतुन कॉग्रेसचे रायगड जिल्हाप्रमुख महेंद्र घरत यांना उमेदवार द्यावी अशी मागणी कॉग्रेस अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष अखलाख भाई शिलोत्री यांनी पदाधिकाऱ्यांसह  कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेत मागणी केली आहे. 
        रायगड जिल्हात कॉग्रेसची ताकद मोठया प्रमाणात असून रायगड मधील उरण मतदार संघ हा महाविकास आघाडीतून कॉग्रेसला मिळून जिल्हाप्रमुख महेंद्र घरत यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत.या अगोदर झोपडपट्टी  व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष  दिपक शंकर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसाह पटोले यांची भेट घेत मागणी केली आहे.तर कॉग्रेस उरण  महिला अध्यक्षा रेखा घरत यांनीही जोरदार मागणी केली आहे 
            कॉग्रेसचे महेंद्र घरत हे डॅशिंग जिल्हाप्रमुख  असून त्यांचा मोठा कामगार कक्षेत्रात दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.तर कॉग्रेसची मोठी ताकद उरण विधानसभा मतदार संघात आहे.त्यामुळे उरण विधानसभा मतदार संघ कॉग्रेस ला मिळून तेथून महेंद्र घरत यांना उमदेवारी द्यावी अशी मागणी कॉग्रेस अल्पसंख्यांक रायगड जिल्हा अध्यक्ष  अखलाखभाई शिलोत्री यांनी पदाधिकाऱ्यासह  कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन मागणी केली आहे, 
          यावेळी कॉग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथल्लाजी, सहप्रभारी बी एम संदीपजी, आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन