खोपोलीत ७०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस व्ही.पी.डब्ल्यू.ए संस्थेचा पुढाकार

 खोपोलीत ७०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस व्ही.पी.डब्ल्यू.ए संस्थेचा पुढाकार 




पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : २३ ऑक्टोबर,

               दरवर्षी प्रमाणे यंदाही खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचे अभियान व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, श्री कृपा एक्वेरियम - खोपोली, लायन्स  क्लब ऑफ - खोपोली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ - खोपोली आणि शहरातील प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबवण्यात आले. जवळपास पंधरा दिवस खोपोली शहरातील विवीध भागात हे  अभियान राबविण्यात आले आणि त्याद्वारे ७०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली. 
                या अभियानासाठी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम, खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काळे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेतर्फे गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांच्यासह अनेक सदस्य तसेच शहरातील प्राणी मित्रांनी या मोहिमेत सहभाग घेतला.श्री कृपा एक्वेरियम चे संचालक प्रवीण शेंद्रे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. 
               आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लसीकरणाचे अभियान राबवले जाते.यंदाचे हे पाचवे वर्ष होते. मागील वर्षी जवळपास पाचशे भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली होती तर यंदा त्याहीपेक्षा जास्त संख्येने लसीकरण करण्याचा संकल्प केला गेला होता त्यानुसार यंदा या अभियानाचा शुभारंभ दिनांक ६  ऑक्टोबर २०२४ रोजी झाला होता . 
          खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे हतबल झालेल्या खोपोलीकरांना या  निमित्ताने काहीं प्रमाणात दिलासा मिळाला आहे.हिमालया हेल्दी पेट फूड, ड्रुल्स पेट फूड, ऑरेंज पेट ,कार्नीवेल पेट फूड, मिस्टिक इत्यादी कंपन्यांनी या मोहिमेसाठी डॉग फूड पुरवले होते.तसेच व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातुन लसीकरणाची व्यवस्था केली गेली आणि डॉ.राहुल मुळेकर, डॉ.विष्णू काळे, डॉ. प्रशांत बिराजदार,डॉ.आसाराम काळे, डॉ.शशिकांत थोरात, सागर कसबे यांनी प्रत्यक्ष योगदान दिले आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन