विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस अमाईन्स केमिकल्स चा स्तुत्य उपक्रम
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
वडगाव : २३ ऑक्टोबर,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव विद्यार्थ्यांच्या शिक्षण च्या समवेत विविध उपक्रम हाती घेत असतांना,त्यांची बोद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने माझी शाळा स्वच्छ शाळा उपक्रमा अंतर्गत सामान्यज्ञान,घोषवाक्य,चित्रकला,अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले.या मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना अमाईन्स केमिकल्स या सी.एस.आर.फंडातून ही बक्षिसे देवून विद्यार्थ्यांचे देण्यांत आली.यावेळी त्यांच्या चेह-यावर हास्य झळकत असतांना पहावयांस मिळाले.
यावेळी सामान्यज्ञान स्पर्धेत देवेन लक्ष्मण पोपेटे इयत्ता पाचवी प्रथम,तर यश तानाजी पाटील इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक तर घोषवाक्य स्पर्धेत कृतिका गोपीनाथ गडगे इयत्ता आठवी प्रथम तर कस्तुरी जयवंत जाधव इयत्ता पाचवी द्वितीय तर चित्रकला स्पर्धेत समर्थ गणेश मुंढे इयत्ता चौथी प्रथम तर कु.अद्विक महादेव शिंदे इयत्ता पहिली द्वितीय क्रमांक पारितोषिक मिळविले आहे.या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाल्यामुळे बक्षिसे देण्यांत आली.
तसेच बेस्ट क्लास स्पर्धेत १ ली ते ४ थी गटात इयत्ता दुसरी प्रथम तर इयत्ता तिसरी द्वितीय व इयत्ता ५ वी ते आठवी गटात इयत्ता पाचवी प्रथम तर इयत्ता आठवी द्वितीय पारितोषिक मिळविले. आहेत.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अल्कलाई अमाईन्स कडून बक्षीस देऊन व शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
-------- चौकट ---------
विद्यार्थ्यांच्या शारिरीक तसेच बोद्धिक विकास व्हावे यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जात असते.त्यांच्या विकासासाठी आशा स्पर्धा होणे आवश्यक आहे.
राजिप शाळा वडगाव,मुख्याध्यापक : सुभाष राठोड
0 Comments