विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करावी - प्रवीणजी काकडे
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २५ ऑक्टोबर,
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी काकडे वस्ती येथील २४ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रवीण काकडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक प्रगती करून कुटुंबाचा व समाजाचा विकास करण्यावर भर द्यावा मानदेश मध्ये पाण्याचा दुष्काळ असला तरी बुद्धीचा दुष्काळ नाही.
अनेक अडचणीवर मात करून आपण शिक्षणाची कास धरून येणाऱ्या संकटावर मात करीत आपले आयुष्य उज्वल करण्यावर भर द्यावा.विद्यार्थी शिक्षण घेत असताना राजकारणात भाग घेऊ नये विद्यार्थी नी मोबाईलचा वापर कमी करून वाचनाची गोडी निर्माण करावी. अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षण घेतले तरच विकास होईल आजही गोरगरीब वंचित घटकातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हाच आमचा ध्यास आहे. म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.यावेळी साहित्य वाटप करताना मा.प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व जगन्नाथ काकडे शरद काकडे रमेश काकडे महेश काकडे विक्रम काकडे, उषा धायगुडे, निता काकडे, नितीन काकडे दत्ता काकडे कुशाबा काकडे, संगीता काकडे व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments