स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अल्काईल अमाईन कंपनी तर्फे पारितोषिक वितरण
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
माजगांव : २५ ऑक्टोबर,
पाताळगंगा परिसरात नावलौखिक असलेली अल्काईल अमाईन कंपनी,ही सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम करीत आहे.आपल्या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेवून अकाशाला गवसणी घालावी यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात.रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी या स्पर्धेत कौशल्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांस अल्काईल अमाईन यांच्या माध्यमातून पारितोषिक देवून गुणगौरव करण्यांत आला.
माझी शाळा स्वच्छ शाळा अभियान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा शारिरीक बरोबर बौद्धिक विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी चित्रकला स्पर्धा,प्रश्नमंजुषा व स्लोगन,स्वच्छता व कचऱ्याचे व्यवस्थापन,हा संदेश गावामध्ये पोहचविण्यासाठी विद्यार्थी आणी सकारात्मक भुमिका बजावली.
विद्यार्थांना शिक्षणा समवेत विविध विषयामध्ये निपूण व्हावे यासाठी येथिल शिक्षक सातत्याने प्रयत्नशिल असल्यांचे पहावयास मिळत आहे.यावेळी मुख्याध्यापक किरण कवाद,शिक्षक भुषण पिंगळे,रेखा जाधव,तसेच अल्काईल अमाईन चे व्यवस्थापक व पदाधिकारी उपस्थित विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यांत आले.
0 Comments