राजिप शाळा तळवली, विद्यार्थ्यांनी फुलविला भाजीचा
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
तळवली : २५ ऑक्टोबर,
शाळेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा,शिवाय कोणतेही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खत वापर करुन मुलांच्या आहारात नित्यनेमाणे भाजी पाला असावा या उद्दात विचारांतून परसबागेत भेंडी, भोपळा, अळू, वांगी, मिर्ची, घेवडा, टॉमेटो इत्यादी विविध भाज्यांची लागवड करण्यात आली.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत खालापूर तालुक्यातील 'उत्कृष्ट परसबाग' म्हणून रायगड राजिप शाळा तळवली, तालुकास्तरीय तृतीय क्रमांक मिळविला आहे.
आज मराठी शाळा कुठेही कमी नाही.शिवाय त्या आता डिजिटल होत चालल्या असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोलाचे योगदान शिक्षक वर्ग करीत आहे.मात्र त्यांच्या आरोग्य विषयी काळजी घेतली जाते.यामुळे शाळेमधून निघणारा ओला व सुका कचरा वेगळा करून या कचऱ्यापासून गांडूळ खत उपक्रम हाती घेवून परसबागेची निर्मिती करण्यांत आली.यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणात पाळे भाज्याचा आहार मिळत आहे.
विद्यार्थी आणी शिक्षकांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी,चोरामले,पोषण आहार अधिक्षक,दिपा परब,माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख - जे.पी.परदेशी यांनी येथिल शाळेचे कौतुक केले.तसेच मुख्याध्यापिका मंगल मुंढे शिक्षक मस्तान बोरगे यांनी परसबाग निर्मितीसाठी मोठे योगदान दिले.तसेच व्यवस्थापन समितीकडून तृतीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांनी अभिनंदन केले.
0 Comments