दस-याच्या शुभ मुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते अनावरण

 दस-याच्या शुभ मुहुर्तावर छत्रपती शिवाजी महाराज  पुतळ्याचे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते अनावरण




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
आंबिवली : १२ ऑक्टोबर,

        आंबिवली येथे हिंदुचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन पुतळयांचे अनावरण या गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते दस-याच्या या शुभ मुहुर्तावर करण्यांत आले.यावेळी मा.आमदार मनोहर भोईर यांनी पुतळ्यास पुष्प हार घालून नत मस्तक झाले.छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या घोष वाक्याची ललकारी गर्जली असल्याचे पहावयांस मिळाले.यावेळी या परिसरातील शिवप्रेमी,व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.आज नवरात्र उत्सवातील आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे दुर्गामातेचे दर्शन घेतले.


                    आंबिवली या ठिकाणी छत्रपती यांचे शिव स्मारक होते.मात्र या ठिकाणी सिंहासनवर विराज मान असल्याचा पुतळा हवा होता.यासाठी शिव प्रेमी यांनी मा.आमदार मनोहर भोईर,यांच्याकडे मागणी केली,असतांना काही दिवसामध्ये पुतळा तयार झाल्यांने आज दस-याच्या शुभ मुहुर्तावर या परिसरातील शिव भक्ताच्या उपस्थित लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यांत आला.तसेच या स्मारकाच्या ठिकाणी शुशोभिकरण, चे काम येथिल शिव भक्तांनी केले.

                  यावेळी मा.आमदार मनोहर भोईर यांच्या समवेत ग्रूप ग्राम पंचायत माजगाव,सरपंच - दिपाली पाटील,उप सरपंच प्रांजळ जाधव,मा.उप सरपंच - राजेश पाटील,संतोषजी खांडेकर,गोरख रसाळ,नरेश पाटील,बाजीराव ढवाळकर,आंबिवली गावातील सर्व शिवप्रेमी उपस्थित होते,यावेळी  ग्रामस्थांच्या वतीने मा.आमदार मनोहर भोईर यांचा शाल व श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सन्मान  करण्यात आला.



Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन