महेश निमणे यांस हस्तरेखा शास्त्र,ए.प्रो. पाल्मिस्ट दिल्ली या नामांकित संस्थेतून पदवी बहाल

 महेश निमणे यांस हस्तरेखा शास्त्र,ए.प्रो. पाल्मिस्ट दिल्ली या नामांकित संस्थेतून पदवी बहाल 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : २ ऑक्टोबर,

           व्यवहारी जिवनात हस्तरेखा शास्त्र यांचे खुप महत्व असून आपल्या तळ हातावर असलेल्या भाग्य रेषा खूप काही सांगून जात असते.मात्र वेळेवर यांचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपले जिवन दुखमय होवू शकते.गेले अनेक वर्ष वास्तू शास्त्रात निपूण असलेले खोपोली येथिल महेश निमणे यांना हस्तरेखा शास्त्र ए.प्रो.पाल्मिस्ट या दिल्लीच्या नामांकित संस्थेतून नुकताच या शास्त्राची पदवी बहाल करण्यांत आली.त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.या माध्यमातून त्यांनी हजारो युवक तसेच विवाहीतांचे जिवन सुखमय केले आहे.
                  हस्तरेखा शास्त्र ही हजारो वर्षांपासून चालत आलेली प्राचीन कला असुन आपल्या हाताच्या तळभागावरील रेषा,सांकेतिक चिन्ह पाहून तुमच्या जीवनातील चालु असलेल्या आणि पुढे घडणा-या घटना याचा अंदाज बांधण्यात येतो.याचे अनेक दाखले आपणास इतिहासात पहावयास मिळत आहेत.या क्षेत्रात अनेक वर्षाचा अभ्यास असून, गेले अनेक वर्ष या वास्तू शास्त्रात निमणे यांनी प्राविण्य मिळवले आहे.

               गेले अनेक वर्ष खोपोली येथे सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस च्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करीत असून या वास्तू शास्त्राचा हजारो व्यक्तींना उत्तम लाभ ही झाला.गुढ विज्ञान या क्षेत्रात वास्तुशास्र,अंकशास्त्र, रेकी,लोलक शास्त्र, यात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व,तसेच पुणे उद्योग भूषण आणि टायकुन ऑफ़ महाराष्ट्र या संस्थेने त्यांस सन्मानित करण्यांत आले होते.तसेच गुढ विज्ञान क्षेत्रात पी एच डी करण्याचे मानस महेश निमणे यांनी व्यक्त केला. 




Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन