खोपोली परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

 खोपोली परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक




पाताळगंगा न्युज :दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ११ ऑक्टोबर,

                विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने  आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक मारत खोपोली नगरपालिका  हद्दीतील अनेक भागात भूमिपूजन केले.
                 खोपोली नगरपालिका  हद्दीतील आदोशी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, मिळगाव ठाकूरवाडी कडील स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता, मिळगाव धनगर वाडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन, शिळफाटा श्रीराम मंदिर येथे सभागृह आणि सुशोभीकरण, लौजी येथे हनुमान मंदिर शेजारी सभागृह  बांधने, लौजी येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले,विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी विविध विकास कामासाठी काट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून आज भूमिपूजन पार पडले.
             यावेळी शिवसेना खोपोली शहराध्यक्ष संदीप पाटील, जेष्ठ माजी नगरसेवक मोहन औसरमल, मा. उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, शिवउद्योग सेना रायगड जिल्हाप्रमुख हरीश काळे, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, युवा सेना अधिकारी संतोष मालकर, मा.नगरसेवक राजू ढुमणे, शेखर जाभळे, ईश्वर कासार,मिळगाव शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुरसळ उपविभाग प्रमुख नाथा पाटील युवा सेना विभाग प्रमुख संदेश पाटील शाखाप्रमुख रोहिदास म्हात्रे,धनगरवाडा शाखाप्रमुख ओमकार घाटे शिवसैनिक महेंद्र पाटील ज्येष्ठ ग्रामस्थ जनार्धन दादा पाटील,परशुराम नाना पाटील, नंदूभाऊ पाटील.वसंतदादा पाटील,सतिष पाटील, योगेश भाऊ कदम ,सागर ढेबे, सुरेश शेडगे, महेश मरगळे,शेवाळे काका, विलास उकेरी, व समस्त महिला भगिनीं आदिसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर