विजेच्या पोलचा शॉक लागल्यांने बैलाचा मृत्यू,शेतकरी चिंताग्रस्त

  विजेच्या पोलचा शॉक लागल्यांने बैलाचा मृत्यू,शेतकरी चिंताग्रस्त 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
माजगाव : ३१ ऑक्टोबर,

       घर तेथे विजेचा पोल हे प्रत्येक ठिकाणी समिकरण आपणांस पहावयांस मिळत आहे.मात्र काही वेळा हेच पोल गुरांनसाठी  जिवघेणी ठरत आहे.माजगांव येथे राहणारे  महेश पाटील ( ढवाळकर )यांच्या घराच्या पाठीमागे गुरांचा गोठा असून त्याच ठिकाणी एक विजेचा पोल असून या मुक्या प्राणी या पोलाच्या संपर्कात येताच  त्यांचा जागीच मृत्यू झाल्यांने कुटुंबावरती दुखाचे सावट पसरले आहे.भात शेतीची कामे सुरु असतांना ही दुर्देवी घटना घडल्यामुळे येथिल ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहे.
            बैलाला विजेचा धक्का लागताच बैल जागेवरचा त्यांचा मृत्यू झाला.मात्र या ठिकाणी असलेले ग्रामस्थ यांनी त्यांस वाचविण्यांचा खूप प्रयत्न केला.मात्र यशस्वी झाला नाही.विषेश म्हणजे दिवाळी सण असल्यामुळे लहान मुले याच ठिकाणी खेळत असल्यांचे समजते.सुदैवाने मुले या पोलाच्या संपर्कात न आल्यामुळे वाचले मात्र या मध्ये मुका प्राण्यांचा नाहक बळी गेला.सदर ही बातमी या पंचक्रोशीत वा-यासारखी पसरली तलाठी, पशु वैद्यकीय अधिकारी तसेच एम.एस.ई.बी च्या कर्मचारी यांनी तातडीने विज पुरवठा खंडीत करुन विज प्रवाह सुरळीत चालु ठेवला.
                सध्या शेतीचे काम सुरु असतांना शेतकरी वर्गांचा बैल विजेच्या धक्याने मृत्यू झाल्यामुळे आता शेतातील चिंताग्रस्त झाला.आपल्या गोठ्यात असलेले गुरांच्या वरती शेतकरी मुलाप्रमाणे प्रेम करीत असतो.कारण शेतीच्या कामात मोठे योगदान असल्यामुळे त्यांचे श्रम कमी होत असते.असे मत उपस्थित ग्रामस्थ आणी शेतकरी वर्गांनी व्यक्त केले.

                    ------ चौकट -------
बैल शेतावरुन घरी येत असतांना घराच्या पाठीमागे गोठा असून याच ठिकाणी विजेचा पोल आहे.मात्र यांच्या संपर्कात येताच विजेचा शॉक लागला तसेच आम्ही त्यांस बाजुला करण्यांचा प्रयत्न केलास आम्हाला सुद्धा विजेचा धक्का बसत होता.
 ( महेश पाटील ( ढवाळकर )बैल मालक माजगाव 

   
           ------ चौकट ------ 
विजेचा शॉक लागला असून बैलाचा मृत्यू पोस्ट मॉटम रिपोर्ट मध्ये नमुद झाल्यास आम्ही शेतकरी वर्गांस नुकसान भरापाई देण्यांचा प्रयत्न करु
 ( एम.एस.ई.बी चौक अभियंता अभिजित बोधनकर )
 
  

  --------    चौकट -------- 
माजगाव येथे बैलाचा मृत्यू झाल्यांची माहिती आम्हास मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी जावून तातडीने पोस्ट मॉटम केले असता.विजेच्या धक्यांने मृत्यू पावल्यांचे समोर आले असून तसा अहवाल आम्ही पुढे पाठविणार आहोत.
( पशु वैद्यकीय अधिकारी - प्रशांत कोकरे )


 

           

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन