इसांबे येथिल वळण धोकादायक , माजगावातील युवकाचा अपघात,कारखान्यातील माती रस्त्यावर,धुळीमुळे अपघाताचा धोका
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
इसांबे / लोहप : १ नोव्हेंबर,
सावरोली खारपाडा या रस्त्यांचे काम काही वर्षापुर्वी उत्तम झाले,यामुळे वहान चालकांच्या शारिरिक व्याधी कमी झाली आहे.मात्र इसांबे या मार्गावर रस्त्यालगत निर्माण होत असलेले ज्युबलियंट फुड ह्या कारखाना मात्र या रस्त्याला केराची टोपली दाखवत आहे.या कारखान्याला भराव साठी अथवा माती वाहून नेण्यासाठी अवजड वहानांचा उपयोग केला जात आहे.परिणामी वाजवी पेक्षा जास्त माती या मध्ये लोड केल्यामुळे या ठिकाणी पडलेली पहावयांस मिळत आहे.नोव्हेंबर महिना हिट चा असल्यामुळे या मातीचे धुळीत रुपांतर झाल्यामुळे माजगाव येथिल वसंत पाटील या व्यक्तीचा अपघात झाल्यामुळे नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहे.
हा कारखाना जिथे निर्माण होत आहे तेथे वळण च्या समवेत रस्त्यावर वाढलेले गवत,आणी साईट पट्टी दिसत नसल्यामुळे अपघातांची मोठी समस्या निर्माण होत आहे.आणी याच मार्गावर हा कारखाना निर्माण होत असतांना यांचे काम मागिल वर्षापासून सुरु आहे.मात्र येथिल स्थानिक कोणत्याही प्रकारची भुमिका घेत नसल्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोस पणे सुरु आहे. प्रवासी वर्गांची सुरक्षा विचारात न घेता येथे काम सुरु आहे.रस्त्यावर वहानातून पडलेली माती पाणी मारुन साफ करण्यांचे सहकार्य करीत नसल्यामुळे काल वसंत पाटील यांचा या ठिकाणी अपघात झाला.तसेच,विनोद ढवाळर तसेच दोन महिन्यापुर्वी कोपरी येथिल युवकाचा अपघात झाला.असे अनेक अपघात या ठिकाणी सातत्याने घडत असल्यामुळे व्यवस्थापक या कडे साफ दुर्लक्ष्य करीत असल्यांचा आरोप येथिल वहान चालक करीत आहे.
या रस्त्यालगत येत असलेले कारखाने स्थानिकांना जरी नोकरी मिळणार असले तरी सुद्धा या मार्गावर प्रवास करणारे यांची सुरक्षा महत्वाची नाही का अशी संतप्त भावना प्रवासी वर्ग व्यक्त करीत आहे.मात्र व्यवस्थापक या कडे साफ दुर्लक्ष्य करीत आहे.परिणामी हा रस्ता प्रवासी वर्गासाठी धोकादायक बनला आहे.मात्र या रस्त्यावर असाच प्रकार सातत्याने घडत राहिले तर परिणामी आम्हाला अंदोलनांचे हत्यार उपसावे लागेल अशी प्रतिक्रिया या मार्गावरुन नित्यनेमाणे प्रवास करणा-यांनी व्यक्त केली.
----------चौकट --------
सावरोली खारपाडा या ठिकाणी रस्त्याचे काम उत्तम प्रकारे झाले आहे.मात्र या ठिकाणी ज्युबलियंट फुड या कारखान्यांचे काम मागिल वर्षा पासून सुरु असून,येथिल माती ओव्हर लोड भरत असून रस्त्यावर इतरत विखुरली जात आहे.रणरणत्या उन्हात मातीचे धुळीत रुपांतर होत असल्यामुळे अपघात वाढ होत आहे.तसेच याच ठिकाणी वळण असल्यामुळे सातत्याने अपघात घडत आहे.
(उबाठा सामाजिक कार्यकर्ते माजगाव, नरेश पाटील )
0 Comments