टाळ-मृदंगाच्या गजराने महामार्ग दुमदुमला,लाखो वारकरी घेणार माऊली चे दर्शन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
कर्जत २३ नोव्हेंबर,
श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शन घेण्यांसाठी पायी दिंडी चे आयोजन राष्ट्रभूषण ह.भ.प.मारुती महाराज राणे,गेली ३६ वर्ष ह्या दिंडीचे आयोजन करण्यांत येत असल्यांचे दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी यांनी सांगितले.राज्यभरातून कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने, वारकरी त्या ठिकाणी प्रस्थान करीत आहे.राज्यभरातून वारकर्यांच्या दिंड्या निघत असल्यामुळे अवघा रंग एक झाला! असेच काही चित्र या महामार्गावर पहावयास मिळत आहे.यामुळे आळंदीच्या दिशेने जाणार्या दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात हा परिसर दुमदुमत आहे.
माऊलींचे दर्शन केव्हा कधी होतयं हा एकच विचार प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये रेंगाळत आहे.यामुळे दिंड्यांतील वारकर्यांच्या सहभागावरून लक्षात येत आहे. की एकादशीनिमित्ताने आळंदी येथे संजीवन सोहळा सुरू झाला असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक दिंड्या आळंदीत पोहोचल्या असल्या तरी सुद्धा दूरवरच्या मोठय़ा दिंड्या दाखल होत आहेत.
यामुळे मुंबई - पुणे महामार्ग भक्तिसागरात न्हाऊन निघाला आहे. ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात महामार्गावरून जाताना वारकर्यांची शिस्त, बद्ध वाहनचालकांची त्यांना मिळणारी साथ यामुळे वारकर्यांची गर्दी देखील त्यांना मार्ग काढून दिला जात आहे.यामुळे दिंडीत थकवा त्यांना जाणवत नाही. माऊली सावकाश जा, माऊली काळजी घ्या, माऊली जाण्यासाठी जागा द्या अशा शब्दांचा परिणाम रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांवर होत आहे. दिंडीतील वारकर्यांना या शब्दामुळे जाण्या-येण्यासाठी गर्दीतून जागा दिली जाते.
0 Comments