पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी

 पराभवाचे शल्य बाजूला ठेवून प्रितम म्हात्रे यांची कार्यक्रमाला हजेरी ,

साखरपुडा जमलेल्या जनसमुदायाने अनुभवला जिगरबाज नेता ,

कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या पाणवल्या कडा 


माय मराठी न्युज : अदित्य सोनावणे                                   मोहपाडा : २५ नोव्हेंबर ,

               अजून विधानसभेचा गुलाल खाली बसला नाही तर  शेकापचे नेते उरण विधानसभे मध्ये लढत देत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले नेते प्रितम म्हात्रे यांनी पनवेल तालुक्यातील तुराडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य वाघमारे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमाला उपस्थित राहून कालच निवडणूक निकाल लागुन पराभव झाला असला तरी तो खेळाडू वृत्तीने स्वीकारत आपण जिगरबाज आहोत हे दाखवून देत कार्यक्रमास उपस्थित राहिले.                                                  कार्यक्रमाच्या ठिकाणी गाडीमधून प्रितम म्हात्रे खाली उतरताच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घालून आपल्या जिगरबाज नेत्याला अभिवादन केले. चेह-यावर पराभवाचे सावट सुद्धा नव्हते. स्मितहास्य चेहरा पाहून कार्यकर्त्यांच्या डोळयांच्या कडा पाणवल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला २४  तास सुद्धा झाले नसताना प्रितम म्हात्रे यांनी पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजायला सुरवात केली आहे. याची गोळा बेरीज त्यांना आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत कामाला येणार आहेत.                                                                                नेता हा जनसामान्य जनतेला आपला वाटणारा असावा याचे आज जमलेल्या जनतेने अनुभवले कार्यक्रमाच्या ठीकाणी असलेली जेवणांच्या पंगतीमध्ये प्रितम म्हात्रे  जाऊन बसले. त्यांची ही कृती पाहून युवकांनी त्याचे फोटो काढून आपले स्टेटस ला ठेवले आहेत. त्यांचा हा साधेपणा पाहून महिला वर्गामध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली.झालेला पराभव स्वीकारत मतदारसंघात पुन्हा भेटीगाठी  सुरू केलेले प्रितम म्हात्रे खऱ्या अर्थाने जननायक ठरले. उरण मतदारसंघात त्यांनी दोन नंबरची 88,878 मते मिळवत महाविकास आघाडीला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. लोकसभेत केलेल्या कामाच्या बद्दल मोठेपणा दाखवत जर शिवसेनेने शेकापला उमेदवारी दिली असती तर आज 50,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने प्रितम म्हात्रे विजयी झाले असते,अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर