मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या कडून आळंदी येथे अन्नदान
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
आंबिवली : २५ नोव्हेंबर,
धर्मशास्त्रात सर्वांत मोठे दान असेल तर ते अन्नदान असे बोलले जाते.गेल्या आठवड्यापासून अनेक दिंड्या ह्या आळंदी येथे प्रस्थान झाल्यामुळे या सर्व साधू संताच्या मुखामध्ये अन्नाचा घ्यास जावा या उद्दात विचारांतून राष्ट्रभूषण ह.भ.प.मारुती महाराज राणे,गेली ३६ वर्ष या दिंडीचे आयोजन करीत असतात.ही दिंडी आळंदी येथे त्यांच्या मराठा धर्मशाळा आळंदी देवाची अगमन झाल्यामुळे ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मा.सरपंच गोपीनाथ जाधव,सखाराम जाधव,आत्माराम जाधव यांच्या हस्ते दिंडीतील वारकरी यांस अन्नदान करण्यांत आले.
गेले आठ दिवस उन्ह वारा,थंडी यांची तमा न बाळगता समस्त वारकरी हे आळंदी येथे कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माउली यांच्या संजिवन समाधीचे दर्शन घेण्यांसाठी जात असल्यांचे पहावयांस मिळत होते.मुखात विठ्ठलांचे नाम भजन करीत ही दिंडी आळंदी येथे अगमन झाल्यांचे पहावयांस मिळत आहे.या मार्गातून जात असतांना अनेक दानशुर व्यक्तीमत्व या वारकरी यांच्यासाठी सोयी सुविधाची सोय करीत असल्यांचे पहावयांस मिळत होते.
गोपीनाथ जाधव हे माळकरी तसेच वारकरी असल्यामुळे आपल्या हातातून सतकार्य घडावे या उद्दात विचारांतून आळंदी येथे जावून या पाय वारी मध्ये सहभागी झालेल्या तमाम वारकरी यांस अन्न दान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या अन्नदातून मनाला खूप मोठे समाधान मिळत असते.जिवनामध्ये धन जमा करुण अनेक माध्यमातून तो सतकर्मी लावणे हीच साधू संताची शिकवण असल्यांचे मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले.
0 Comments