भाजप चे सक्रिय सदस्य व्हा…

 भाजप चे सक्रिय सदस्य व्हा…

भाजपा आध्यात्मिक समन्वय चे रायगड जिल्हा संयोजक रायगड भूषण काशिनाथ पारठे यांचे आवाहन !






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : ३० नोव्हेंबर,
         
                 आपल्याला जर भारतीयत्व जपून सर्व क्षेत्रात प्रगती करायची असेल, पुढील पिढ्यांचे भविष्य उज्वल हवे असेल तर एकता दाखवणे आवश्यक आहे.व समृद्ध समाज व देशासाठी भाजपा आवश्यकच आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाने भाजपाची सदस्यता घेतली पाहिजे.असे अवाहन भाजपा आध्यात्मिक समन्वय चे रायगड जिल्हा संयोजक रायगड भूषण काशिनाथ पारठे यांनी केले आहे.
             पनवेल चे कार्यसम्राट आमदार सलग चौथ्यांदा बहुमताने निवडून आल्यामुळे मार्केट यार्ड पनवेल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यांत आले होते यावेळी भाजपा सदस्यता आभियान “संघटनपर्व अभियानांची सुरुवात करण्यांत आली.गावोगावी तरुण वर्गांचा वाढता पाठींबा आणी विधान सभेत मिळालेल्या घवघवीत यश यामुळे भाजप अग्रेसर असल्यामुळे सक्रिय सदस्य साठी 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल करण्यांचे अवाहन करण्यांत आले आहे.
        यावेळी या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा संयोजक नितीन पाटील, आध्यात्मिक समन्वय जिल्हा संयोजक काशिनाथजी पारठे,जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, दीपक बेहेरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, सुनील घरत, वसंत भोईर, चंद्रकांत घरत, रमेश मुंढे, रूपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
               या वेळी रायगड जिल्हा भाजपच्या वतीने जिल्ह्यातील सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, आदिती तटकरे, महेश बालदी, रविशेठ पाटील, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या महायुतीच्या सातही विजयी उमेदवारांचा तसेच कोकणाचे मार्गदर्शक ठरलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे चौथ्यांदा विजयी होऊन रायगडमध्ये इतिहास घडविणारे आमदार प्रशांत ठाकूर तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पडणारे अविनाश कोळी यांचा या बैठकीत जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
            

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर