घोडीवली गावात दोन घरांची घरफोडीत चोरट्याने लाखोचे ऐवज केले लंपास ,गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

 घोडीवली गावात दोन घरांची घरफोडीत चोरट्याने लाखोचे ऐवज केले लंपास ,गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 





माय मराठी न्युज : नवज्योत पिंगळे 
घोडीवली : २ डिसेंबर,

  
        खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील घोडीवली गावामध्ये २ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास २ घरांची घरफोड्या झाल्याने घोडीवली गावकऱ्यांसह परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.                                             काही महिन्यापूर्वी घोडीवली गावात पाच ठिकाणी घरफोडीची घटना घडली होती.परंतु त्या घरफोडीमध्ये कोणतीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली नसताना या चोरीच्या घटनेला काही दिवस उलटून गेल्या नंतर घोडीवली गावात मध्ये २  डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास २ बंद घराचे लॉक तोडून चोरटे घरामध्ये घुसले असून घरातील मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली असता चोरट्यानी संधीचा फायदा घेत गणेश दुधाजी पिंगळे यांच्या घरातील कपाट तोडून काही किंमती वस्तू, गंठण, हार, चैन व काही रक्कम लंपास केल्या असून अशी माहिती घरातील लोकांनी दिली असून चोरट्यांनी दुसरा घर शशीकांत काळुराम पिंगळे फोडला चोरट्यांच्या हाती या घरात काहीच लागले नाही.
               तर गावामध्ये काही ठिकाणी सीसीटिव्ही आहेत, परंतु घर एका बाजुला असल्यामुळे कोणतीही व्यक्ती निदर्शनास आली नसल्यामुळे पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.मुंबई पुणे हायवे वरील खालापुर नजदीक घोडीवली गाव जवळपास अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेले गाव असून हे गाव नेहमीच वेगवेगळ्या चर्चेने तालुक्यात चर्चेचे असताना गेल्या काही महिन्यात या गावात चोरीचा सुळसुळाट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 
          या चोरीच्या घटना ताज्या असताना २ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एकदा दोन घरांची घरफोडी करत लाखोचे ऐवज लंपास केल्याने घरातील सदस्य यांचे म्हणणे आहे यामुळे येथिल नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.तर येथील चोरटे  शोधण्यांसाठी पोलीसांनी तपासांची चक्रे फिरवली आहेत.तरी नागरिकांनी सतर्क करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर