गटशिक्षण अधिकारी - कैलास चोरामले यांच्या हस्ते बक्षीस वितरण

 केंद्रस्तरीय  क्रीडा आणि व्यक्तिमत्वविकास स्पर्धा संपन्न.

    गटशिक्षण अधिकारी - कैलास चोरामले यांच्या हस्ते बक्षीस वितरण 



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १४ डिसेंबर,

         रायगड जिल्हा परिषद आणि पंचयात समिती व  शिक्षण विभाग खालापूर यांच्या आदेशाने कारगाव केंद्रामध्ये  दोन दिवसीय क्रीडा आणि व्यक्तिमत्वविकास स्पर्धा आयोजित करण्यांत आले.या स्पर्धा १२  ते १३  डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. यामध्ये क्रीडा स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा तुरमाळ तर व्यक्तिमत्व स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा कारगाव येथील (कोयनारत्न कै, कृ. ना मुसळे )सभागृहात पार पडल्या, 
          कारगाव केंद्रात बहुतेक शाळा ह्या दुर्गम भागात येत असून येथील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता,यामध्ये प्रामुख्याने लगोरी, बेचकीने नेम धरने, गायन, नृत्यकला  होते, या स्पर्धेत क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत अनेक विद्यार्थांनी  सहभाग घेऊन  प्रथम द्वतीय आणि तृतीय क्रमांक क्रमांकांचे पारितोषिके पटकविले, 
              या सर्व विजेत्यांस शाळा आणि विद्यार्थ्यांना गटशिक्षण अधिकारी कैलास चोरामले यांच्या हस्ते पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना गुण गौरविण्यांत आले. 
 कारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दोन दिवसीय स्पर्धा अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या,या क्रीडा स्पर्धेत जिल्हा पंच म्हणून शिक्षक हरिश्चंद्र साळुंखे यांनी काम पाहिले, 
           यावेळी शिक्षक मधुकर बैसाणे, गजानन राऊत, संजय जाधव, तूरमाळ शाळेचे  मुख्याध्यापक राजेंद्र दुर्गे  शाळा प्रमुख सुनील पांगारे,सुधीर घोडके सचिन पाटील, सागर रणदिवे प्रवीण माडेवार, विनोद नारगुडे, संजय राठोड, ज्ञानेश्वर चाटे, मोहन दहिफळे, प्रवीण खंडागळे, सुनीता झावरे, स्वाती मुसळे, रोहिणी भंडारे, सोहाली सातूनकर, गारमाळ शाळेच्या मुख्याध्यापिका सविता दारशेवाड, रुपाली मोडक, श्वेता घोसाळकर, आरती जाधव आदिसह तसेच तुरमाळ ग्रामस्थ,कारगाव ग्रामस्थ शिक्षक, ग्रामपंचायत यांनी विशेषतः मेहनत घेतली. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर