शनिवार दप्तर मुक्त शाळा,विद्यार्थ्यांनी बनवल्या ब्रेन कॅप,अगस्त्या फाऊंडेशन चा पुढाकार
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
वडगाव : २८ डिसेंबर,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव विविध उपक्रमामध्ये सातत्याने नेहमीत चर्चेत असलेल्या एक दिवस दप्ताराविना शाळा हा उपक्रम राबवून आणी अगस्त्या फाऊंडेशन च्या पुढाकार व विज्ञान विषयाला अनुसरुन विद्यार्थ्यांनी स्वताहून ब्रेन कॅप बनवून आपल्या डोक्यामध्ये परिधान केली.
शनिवार दप्तर मुक्त शाळा,विद्यार्थ्यांनी बनवल्या ब्रेन कॅप,अगस्त्या फाऊंडेशन चा पुढाकार
शिक्षणा समवेत वैज्ञानिक दृष्टिकोन आणी मानवी संरचना हा एक महत्वाचा भाग असून हा शिक्षणा मध्ये येत असतो.शिवाय एक दिवस दप्तर बाजूला ठेवून विज्ञानांची कास धरावी यामुळे आपल्याला त्यांची जाणीव निर्माण होईल.या उद्दात विचारांतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
------------ चौकट ------------
सर्व मुले व शिक्षक डोक्यावर कॅप घेऊन शाळेतून निघाले,या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.राठोड सर हे नेहमीच काहीतरी छान उपक्रम शोधून काढत असतात,त्यामुळे शाळेचे शैक्षणिक आकर्षण कायम राहते. शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष - करुणा रविंद्र ठोंबरे
------------ चौकट ------------
सिप्ला व अगस्त्या फाऊंडेशन कडून याबाबत प्रशिक्षण मिळाले,त्याचा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी उपयोग होत आहे,छोटे छोटे प्रयोग मुले आनंदाने करत आहेत.यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे
मुख्याध्यापक शाळा वडगाव,सुभाष राठोड
0 Comments