खोपोली नगरपरिषदेचा भोंगळ कारभार...
३ वर्षांपूर्वी इशारा देऊन सुद्धा रस्त्यावरील पत्राप्लेट जैसे थे..
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १६ डिसेंबर,
खोपोली शहरातील सोमजाई वाडी येथून खालची खोपोली म्हणजे गुरुवार बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध गटारावर टाकलेली लोखंडी पत्रा प्लेट यामुळे त्या बाजूला निर्माण झालेला खड्यामुळे दुचाकीस्वारांचे अनेक अपघात होत असून नगरपरिषदेचे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासन नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल शिवसेना संघटिका आसावरी घोसाळकर यांनी उपस्थित केला आहे.
३ वर्षा पूर्वी अनेक वृत्तपत्रमधून ह्या बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ही खोपोली नगरपरिषदेच्या अधिकारी यांच्या कडून यांच्या कडून याबाबत कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही याबाबत खोपोली नगरपरिषदेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. याबाबत शिवसेना संघटिका आसावरी घोसाळकर व सोमजाई वाडी खोपोली येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
0 Comments