पौध वाडी ,माजगांव वाडी ला मिळाली स्मशान भुमी

 पौध वाडी ,माजगांव वाडी ला मिळाली स्मशान भुमी 

गेली अनेक पिढ्या नदिच्या काठावर अत्यसंस्कार,लोकनियुक्त सरपंच दिपाली नरेश पाटील यांचा पुढाकार 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली : १४ डिसेंबर,

          ग्रूप ग्राम पंचायत माजगाव हद्दित येत असलेल्या दोन अदिवासी वाडीला गेले अनेक पिढ्यान पिढ्या अत्यसंस्कारासाठी स्मशान भुमी नव्हती यामुळे खोपोली हून आलेली पाताळगंगेच्या किणा-यावर अत्यसंस्कार होत होते.पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत होती मात्र सरपंच पदासाठी उभे असलेल्या दिपाली नरेश पाटील यांनी जाहिर नाम्यात मी खुर्चित बसेल अथवा नाही बसले तरी सुद्धा तुमच्या स्मशान भुमी चे काम पुर्ण करुन देईल अखेर निवडणूकीत विजयी झाल्या आणी त्यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. या ठिकाणी स्मशान भुमी बांधली यामुळे सरपंच सह सदस्य,ग्रामसेवक यांचे या अदिवासी बांधवांनी आभार मानले.
            ग्रूप ग्राम पंचायत माजगांव नेहमी विकास कामामध्ये चर्चेत असून गेले अनेक पिढ्या अदिवासी बांधवांची अत्य संस्कारासाठी होत असलेली गैरसोय यामुळे त्यांच्या वेदना या जवळून पाहत एक सुशिक्षित सरपंच म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.महिला वर्गांस समस्यांची जाणीव असून त्या सोडविण्यांचे काम महिला वर्ग करु शकते यासाठी महिला लोकनियुक्त  सरपंच म्हणून निवडूण दिल्यांचे येथिल ग्रामस्थांनी प्रतिनिधी शी बोलतांना संगितले. 
             लोकनियुक्त सरपंच दिपाली नरेश पाटील यांनी या पदावर विराज मान झाल्यापासून विविध विकास कामाकडे लक्ष केंद्रित केले असून काही विकास कामे पुर्णत्वास झाली आहे.गावातील समस्या शोधून ते मार्गी लावण्यांचे काम करीत असल्यामुळे आपणांस उत्तम असा सरपंच या पदावर विराजमान झाल्यांची चर्चा ऐकण्यांस मिळत आहे.

-------------- चौकट-----------
माजगाव वाडी,आणी पौध वाडीतील ग्रामस्थांना स्मशान भुमी नव्हती नदिच्या किणा-यावर अत्यसंस्कार केले जात होते.मात्र या लोकनियुक्त सरपंच दिपाली नरेश पाटील यांनी आमची मोठी समस्या मार्गी लावली आहे.यामुळे आम्ही ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो.( सामाजिक कार्यकर्ते माजगांव वाडी - कमलाकर वाघे )

      

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर