भाजपा सनी यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांना जिवनाश्यक वस्तू वाटप,
तुरमाळ शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार वर्षभर शैक्षणिक साहित्य
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २९ डिसेंबर,
आज वाढदिवस साजरा करण्याचे विविध क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाले आहे.आपला वाढदिवस मोठ्या दिमाख्यांने साजरा व्हावे या प्रत्येकांचा हट्टास असतो.त्यासाठी विविध ठिकाणी बॅनर बाजी केली जाते. भारतीय जनता पार्टी ( बीजेपी ) भाजपा खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव यांनी आपला वाढदिवस कोठे ही साजरा न करता दूरशेत ग्रामपंचायत हद्दीतील तुरमाळ येथील आदिवासी बांधवांना जिवनाश्यक वस्तू वाटप करुन आपला वाढदिवस साजरा करण्यांत आला.
सध्या वातावरणात थंडी वाढली असून डोंगराच्या कुशीत वास्तव्ये करीत असलेल्या अदिवासी बांधवांना मायेची उब मिळावी या उद्दात विचारांतून हा उपक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाती घेण्यांत आला.तसेच या रायगड जिल्हा परिषद शाळा तुरमाळ येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर शैक्षणिक साहित्यांची कमतरता जाणवू नये यासाठी हे त्यांस देण्यांचे अश्वासन यावेळी विद्यार्थ्यांस दिले.आज ही समाज्यामध्ये असे दानशूर व्यक्ती मत्व आहे की ते आपल्या धनाचा वापर गोर गरिबांसाठी खर्च करीत आहे.राजकीय शेत्रात कमी वेळात युवा नेतृत्व म्हणून काम करणाऱ्या सनी यादव यांनी असेच सामाजिक उपक्रम करत राहावे असे वक्तव्य प्रल्हाद केणी यांनी वाढदिवसाच्या वेळी दिल्या.
यावेळी कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख - प्रल्हाद केणी, खालापूर तालुका सरचिटणीस भाजपा - रवींद्र पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष -हरिभाऊ जाधव,खालापूर शहर अध्यक्ष भाजपा- दिपक जगताप,शक्तिकेंद्र प्रमुख - मोहन घाडगे,बुध अध्यक्ष- निलेश साळुंखे,तालुका संयोजक सोशल मीडिया- शुभम सकपाळ ,साजगाव पंचायत समिती उपाध्यक्ष-अनिकेत साळुंखेकुणाल शिंदे ( उद्योजक),सुरेश साळुंखे ( गाव प्रमुख)प्रणित साळुंखे( उद्योजक),विजय साळुंखे (उद्योजक)उदय साळुंखे (उद्योजक)कल्पेश साळुंखे ,पांडुरंग हिरवे , ज्ञानेश्वर पगारे,संजय साळुंखे ,संतोष साळुंखे ,प्रवीण मुसळे ,पांडुरंग पाटील आदि पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी बांधव उपस्थित होते.
0 Comments