विविध वेष भुषा करुन सरत्या वर्षाला निरोप,राजिप शाळा वडगाव चा स्तुत्य उपक्रम
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
वडगाव : १ जानेवारी,
नविन वर्षाचे स्वागत आणी सरत्या वर्षाला अभिवादन करण्यांसाठी रायगड जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी सायंकाळी एकत्र येत विविध महापुरुषांची वेष भुषा करुन तसेच महाराष्ट्रातील विविध धर्माचे पोषाक आणी फॅन्सी ड्रेस परिधान करुन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
यावेळी प्रत्येक विद्यार्थी ह्यांने वाघ,शिकारी, सावित्रीबाई फुले,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पंडित जवाहरलाल नेहरू,मनमोहन सिंग,कोळी,आदिवासी,भूत अशा विविध वेशभूषेतील विद्यार्थी पहावयास मिळाले.मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या या अफलातून संकल्पतून व पालकवर्गातून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत वातावरण प्रसंन्न केले.छोटी नाट्य,पथनाट्य सादर करून शैक्षणिक व सामाजिक संदेश देण्यांत आला.सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप देणारी वडगाव शाळा आज परिसरातील कुतूहलाचा विषय ठरला आह.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा,उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.त्याचबरोबर शिक्षक वैजनाथ जाधव,मयुरी धायगुडे,स्वयंसेविका व पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments